महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी, विनेश अंतिम फेरीत - विनेश फोगट अंतम फेरीत बातमी

भारतीय कुस्तीपटूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये, उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तबिलिसी ग्रां. पी स्पर्धेमध्ये बजरंग पुनिया याने सुवर्णपदक जिंकले. तर भारताची अव्वल महिला कुस्तीपटू विनेश फोगटने मेदवेद कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे.

बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी, विनेश अंतिम फेरीत

By

Published : Aug 11, 2019, 7:47 AM IST

नवी दिल्ली - भारतीय कुस्तीपटूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये, उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तबिलिसी ग्रां. पी स्पर्धेमध्ये बजरंग पुनिया याने सुवर्णपदक जिंकले. तर भारताची अव्वल महिला कुस्तीपटू विनेश फोगटने मेदवेद कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे.

बजरंग पुनिया याने पुरुषाच्या फ्री स्टाईल कुस्तीमध्ये अंतिम सामन्यात इराणच्या पेइमन बिब्यानीला २-० ने मात दिली. उल्लेखनीय बाब म्हणजे, बजरंगने मागील वर्षीही ताबिलसी ग्रां पीमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

बेलारुसच्या मिन्स्कमध्ये मेदवेद कुस्ती स्पर्धेत विनेश हिने महिलांच्या ५३ किलो वजनी गटात स्थानिक कुस्तीपटू याफ्रेमेनका हिचा एकतर्फी पराभव केला. विनेशने याफ्रेमेनकाला ११-० ने अशी मात दिली.

काही दिवसांपूर्वीच विनेश फोगटने वॉरसॉ येथे झालेल्या पोलंड ओपन कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. तिने ५३ किलोग्रॅम वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते. मेदवेद कुस्ती स्पर्धेत विनेशने अंतिम सामना जिंकल्यास तिचे हे सलग चौथे सुवर्णपदक होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details