नवी दिल्ली : कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा कुस्ती महासंघाविरोधात आंदोलन सुरू केले आहे. कुस्तीपटूंनी आपल्यावर अन्याय होत असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकारे धक्काबुक्की आणि त्रास दिल्याचा आरोप कुस्तीपटूंनी केला आहे. दुसरीकडे, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनीही ट्विट करून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे की, भारतीय कुस्तीपटू त्यांच्या हक्कांसाठी लढत आहेत आणि या देशात ते त्यांच्या हक्कांसाठी लढत राहतील. तसेच त्यांचे अन्न- पाणी बंद केले जात आहे, हे आश्चर्यकारक आहे.
कुस्तीपटूंनी पत्रकार परिषद घेतली : सर्व पैलवान जंतरमंतर येथे रात्रभर मुक्कामी असल्याचेही समोर आले असून पोलिसांनी येथून एकाही पैलवानाला उचलले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस गुन्हा दाखल करू शकतात. दुसरीकडे, रविवारी सायंकाळी चार वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत विनेश फोगट, साक्षी आणि बजरंग पुनिया यांनी कुस्ती महासंघाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत न्याय मिळेपर्यंत जंतरमंतरवरच राहणार असल्याचे जाहीर केले. संध्याकाळी उशिरा कुस्तीपटूंनी पत्रकार परिषद घेतली. रात्री उशिरापर्यंत कुस्तीपटूंनी जंतरमंतरवर मुक्काम केला.