नई दिल्ली -तिहार जेलमध्ये दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार आता फिटनेस गुरूची भूमिका निभावत आहे. जेल कर्मचाऱ्यांना तो फिट राहण्याचे टिप्स देत आहे. या सोबत सुशील कुस्तीच्या माध्यमातून शरीर कसं मजबूत केलं पाहिजे, याची माहिता देत आहे. तो जेल कर्मचाऱ्यांना काय खाल्ल पाहिजे आणि काय खाल्ल नाही पाहिजे, हे देखील सांगत आहे.
कुस्तीपटू सुशील कुमार सागर धनकर हत्या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. यामुळे त्याला तिहार जेलमध्ये कैद करण्यात आलं आहे. जेलमध्ये सुशीलने प्रोटीन युक्त जेवणाची मागणी केली होती. पण जेल प्रशासनाने त्याची मागणी फेटाळली. यानंतर त्याने टोकियो ऑलिम्पिक सामने पाहण्यासाठी टीव्हीची मागणी केली. त्याची ही मागणी जेल प्रशासनाने पूर्ण केली. आता सुशीलने जेल मधील कर्मचाऱ्यांना फिट बनवण्याचा निश्चय केला आहे. तो यासाठी जेल कर्मचाऱ्यांना खास टिप्स देत आहे.
जेलमधील सूत्रांनी सांगितलं की, सुशील काही वेळासाठी कर्मचाऱ्यांसह बाहेर येतो. यावेळी त्याच्यासाठी खास सुरक्षा ठेवली जाते. जेल कर्मचारी सुशीलकडून फिट राहण्यासाठी टिप्स घेत आहेत. जेलमध्येच सुशीलची फिटनेस शाळा सुरू आहे. तो फिटनेस सोबत कर्मचाऱ्यांना डायट टिप्स देखील देत आहे. सूत्रांच्या मते, जेल कर्मचारी सुशीलच्या ऑलिम्पिक पदक विजेता बनण्याच्या प्रवासाची कहाणी देखील त्याच्याकडून ऐकतात.