नवी दिल्ली:कुस्ती विश्वातून एक विचित्र घटना समोर आली आहे. कॉमनवेल्थ गेम्सच्या निवड चाचण्यांदरम्यान 125 किलो फ्रीस्टाइल प्रकारात कुस्तीपटू सतेंदर मलिकने ( Wrestler Satender Malik ) पराभूत झाल्यावर रेफ्रीला मारहान केली ( Wrestler Satender punches referee ) होती. त्यामुळे त्याला भारतीय कुस्ती महासंघाने (WFI) मंगळवारी त्याच्यावर आजीवन बंदी घातली आहे. प्रतिस्पर्धी मोहितकडून सामना गमावल्यानंतर सतेंदरने निराशेने रेफ्रींना मारहान केली.
डब्ल्यूएफआयचे सहाय्यक सचिव विनोद तोमर ( WFI Assistant Secretary Vinod Tomar ) यांनी स्पोर्ट्स तकला सांगितले की, डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग चाचणी सामन्याच्या वेळी उपस्थित होते. त्यांनी सतेंदरवर तत्काळ कारवाई करत त्याच्यावर आजीवन बंदी घातली आहे.