मुंबई - विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत इतिहास घडवल्यानंतर कुस्तीपटू राहुल आवारेने अजून अक विक्रमी कामगिरी केली आहे. राज्याची शान असलेल्या राहुलने 61 किलो वजनी गटातील जागतिक कुस्ती क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
हेही वाचा -लंकेला मिळाला नवीन मलिंगा, पदार्पणातच घेतले ७ धावांत ६ बळी..पाहा व्हिडिओ
विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत राहुलने ६१ किलो वजनी गटात कांस्यपदकाच्या लढतीत अमेरिकेच्या टेलर ग्राफचा ११-४ असा पराभव केला. तर, २० वर्षीय दीपक पुनियाने ८६ किलो वजनी गटाच्या अव्वल स्थानी झेप घेतली. विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दीपक पुनियाने रौप्यपदक पटकावले होते. डाव्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे त्याने अंतिम सामन्यातून माघार घेतली होती.
महिलांमध्ये विनेश फोगाटने कांस्यपदकाच्या कमाई करताना 53 किलो वजनी गटाच्या दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. या स्पर्धेत कांस्यपदक पटकावणारा बजरंग पुनियाची ६५ किलो गटात दुसर्या स्थानावर घसरण झाली आहे.