रोम -भारताचा अव्वल कुस्तीपटू बजरंग पुनियाने रोममधील मातेओ पालिकोन रँकिंग येथे सुवर्णपदक जिंकले आहे. बजरंगने ६५ किलो वजनाच्या फ्री स्टाईल प्रकारात ही कामगिरी केली. अंतिम सामन्यात बजरंगने मंगोलियाच्या तुल्गा तुमूर ओचीरचा २-२ असा पराभव केला.
बजरंगला पहिला क्रमांक...
सुमारे एक वर्षानंतर आंतरराष्ट्रीय सर्किटमध्ये परतणार्या २७ वर्षीय बजरंगने अंतिम ३० सेकंदात दोन गुणांसह विजय मिळविला. बजरंगने उपांत्य फेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या जोसेफ ख्रिस्तोफरला पराभूत केले. या कामगिरीनंतर बजरंगने ६५ किलो वजनी गटाच्या जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानी झेप घेतली आहे. गेल्या वर्षीही या स्पर्धेत बजरंगने अमेरिकेच्या जॉर्डन ऑलिव्हरला हरवून सुवर्णपदक जिंकले होते.
याआधी कांस्यपदकाच्या सामन्यात रोहितला तुर्कीच्या हम्झा अलकाकडून १०-१२ असा पराभव पत्करावा लागला. तर, महिलांमध्ये ५३ किलो वजनी गटात विनेश फोगाटने सुवर्णपदक जिंकले आहे.
हेही वाचा - विंडीजचा मालिकाविजय, तिसऱ्या टी-२० सामन्यात लंकेला हरवले