नवी दिल्ली - भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने सोशल मीडियावरून आपली 'एक्झिट' घेतली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला बजरंगकडून पदकाची अपेक्षा आहे. त्यामुळे आपल्या ध्येयाकडे लक्ष देण्यासाठी बजरंगने सोशल मीडियापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे.
बजरंग ट्विट करत म्हणाला, "मी आजपासून माझे सर्व सोशल मीडिया हँडल बंद करीत आहे. आता ऑलिम्पिकनंतर मी तुम्हा सर्वांना भेटेन ... आशा आहे की तुम्ही तुमचे प्रेम नेहमी देत राहाल. जय हिंद ठेवा.'' बजरंगने २०१९च्या जागतिक स्पर्धेत कोटा मिळवून ऑलिम्पिकमध्ये प्रवेश केला. अमेरिकेत महिनाभराच्या शिबिराला हजेरी लावून नुकताच तो घरी परतला आहे. गुरुवारीपासून इटलीमध्ये होणाऱ्या जागतिक कुस्ती क्रमवारी मालिकेच्या स्पर्धेत बजरंग भाग घेईल.