महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

कौतूकास्पद.! कुस्तीपटू बजरंगने नाकारला हुंडा, लग्नासाठी 'दंगल गर्ल'च्या बहिणीला दिला होकार - बजरंग पूनियाची पत्नी संगीता फोगट

गीता फोगटने बजरंग आणि संगीता यांच्या छोटेखानी समारंभातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्याला बजरंग पुनिया आणि संगीता फोगाट यांना रोक्यानिमित्त शुभेच्छा...असे कॅप्शनही तिने दिले आहे. सोनीपत येथील मॉडल टाउन येथे हा सोहळा पार पडला.

कौतूकास्पद.! कुस्तीपटू बजरंगने नाकारला हुंडा, लग्नासाठी 'दंगल गर्ल'च्या बहिणीला दिला होकार

By

Published : Nov 24, 2019, 8:26 PM IST

नवी दिल्ली - भारताचा स्टार पुरुष कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि दंगल स्टार कुस्तीपटू गीता फोगट हिची छोटी बहिण संगीता फोगट यांचा साखरपुडा रविवारी पार पडला. या संदर्भात गीता फोगटने सोशल मीडियावर पोस्ट लिहीत धाटक्या बहिणीचा रोका झाल्याचं जाहीर केलं. कौतुकाची बाब म्हणजे, बजरंगने हुंड्याला विनम्रतेने नकार दिला. त्याऐवजी त्याने अवघा १ रुपया घेऊन लग्नासाठी होकार दिला आहे.

गीता फोगटने बजरंग आणि संगीता यांच्या छोटेखानी समारंभातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्याला बजरंग पुनिया आणि संगीता फोगाट यांना रोक्यानिमित्त शुभेच्छा...असे कॅप्शनही तिने दिले आहे. सोनीपत येथील मॉडल टाउन येथे हा सोहळा पार पडला.

कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि संगीता फोगट यांच्यात बर्‍याच दिवसांपासून मैत्री आहे. हे पाहून दोन्ही कुटुंबातील लोकांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. बजरंग आणि संगीता यांचा विवाह सोहळा पुढच्या वर्षी म्हणजेच २०२० मध्ये पार पडेल.

दरम्यान, संगीता हिची मोठी बहिण दंगल गर्ल बबीता फोगट हिचा विवाह १ डिसेंबरला होणार आहे. यासाठी सर्व फोगट परिवार तयारीत गुंतला आहे. बबीताच्या लग्नानंतर फोगट परिवार संगीताच्या लग्नाची तयारी करणार असल्याचे, फोगट परिवाराने सांगितलं.

हेही वाचा -ISSF World Cup Finals: भारताचा 'ट्रिपल' धमाका : मनू, एल्वनिल आणि दिव्यांशने जिंकले 'सुवर्ण'पदक

हेही वाचा -सहा वेळा विश्वविजेती मेरीला ऑलिम्पिकसाठी निखतसोबत खेळावी लागणार चाचणी लढत

ABOUT THE AUTHOR

...view details