महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'दंगल गर्ल' बबिता फोगटला उतरायचंय लोकसभेच्या आखाड्यात, भाजपाबाबत केलं मोठं वक्तव्य - लोकसभा निवडणूक २०२४

Babita Phogat : कुस्तीपटू बबिता फोगटला भाजपाकडून आगामी लोकसभा निवडणूक लढवायची आहे. तिनं या आधी विधानसभा निवडणूक लढवली होती. यात तिचा पराभव झाला होता.

Babita Phogat
Babita Phogat

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 8, 2024, 9:23 AM IST

बबिता फोगट

चरखी दादरी (हरियाणा) Babita Phogat :दंगल गर्ल बबिता फोगटनं पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बबितानं गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत वक्तव्य केलं होतं. विशेष म्हणजे, बबिता फोगट ही कुस्तीपटू विनेश फोगटची बहीण आहे. विनेशनं काही दिवसांपूर्वी कुस्ती असोसिएशनच्या वादात खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार केंद्र सरकारला परत केला होता.

हायकमांडच्या ग्रीन सिग्नलची वाट : बबिता फोगट म्हणाली की, तिला आगामी लोकसभा निवडणूक लढवायची आहे. ती फक्त हायकमांडच्या ग्रीन सिग्नलची वाट पाहत आहे. आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीची जय्यत तयारी सुरू आहे. पक्षाचे कार्यकर्ते मैदानात उतरून मेहनत घेत आहेत. दंगल गर्ल बबिता फोगटची लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा कोणापासूनही लपलेली नाही. गेल्या डिसेंबरमध्येही तिनं असं वक्तव्य केलं होतं.

विधानसभा निवडणुकीत पराभव : बबिता फोगटनं या आधी भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत ती 24,786 मतं मिळवून तिसऱ्या क्रमांकावर राहिली होती. यानंतर सरकारनं तिला हरियाणा महिला विकास निगमच्या अध्यक्षपदी नियुक्त केलं. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या बबिता फोगटला आता भाजपाच्या तिकिटावर भिवानी-महेंद्रगड लोकसभा निवडणूक लढवायची आहे.

क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयाचं कौतुक : बबिता फोगटनं डब्ल्यूएफआयच्या बाबतीत क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयाचं कौतुक केलं. खेळाडूंच्या बाजूनं चांगला निर्णय घेण्यात आल्याचं बबित फोगटनं म्हटलं. विनेश फोगटचं नाव न घेता ती म्हणाली, क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयाचं सर्व खेळाडूंनी स्वागत केलं पाहिजे. अशा निर्णयांमुळे खेळाडूंचे भविष्य घडेल. क्रीडा मंत्रालयानं कुस्ती संघटना विसर्जित केली आहे. कुस्ती असोसिएशनच्या वादात बबिताची बहीण विनेश फोगटही विरोध करत आहे. विनेशनं आपला खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार सरकारला परत केलाय.

हे वाचलंत का :

  1. विनेश फोगटनं खेलरत्न, अर्जुन पुरस्कार कर्तव्यपथावर ठेवला; बजरंग पुनिया, विजेंदर सिंगची समर्थनार्थ पोस्ट
  2. माझा कुस्तीशी आता काहीही संबंध नाही, संजय सिंह माझे नातेवाईक नाहीत - ब्रिजभूषण शरण सिंह

ABOUT THE AUTHOR

...view details