नवी दिल्ली - कुस्तीपटू बबिता फोगाटने हरयाणामधील क्रीडा व युवा विभागातील उपसंचालकपदाचा राजीनामा दिला आहे. यावर्षी ३० जुलै रोजी बबिताची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती.
बिहारमधील विधानसभा निवडणुकांव्यतिरिक्त बडोदा विधानसभा पोटनिवडणुकीत सक्रिय सहभाग असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे तिने सांगितले आहे. बबिता आणि कबड्डीपटू कविता देवी यांची यंदाच्या राज्य क्रीडा विभागात उपसंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू बबिता फोगाटने हरयाणा पोलीस दलातील आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. तिने १२ ऑगस्ट २०१९रोजी वडील महावीर फोगाट यांच्यासोबत भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर लगेच बबिताने १३ ऑगस्ट २०१९ रोजी पोलीस दलातील नोकरीचा राजीनामा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवून दिला होता.
२०१४च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेती खेळाडू बबिताने गेल्या वर्षी दादरी मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढली होती. मात्र, त्यात तिचा पराभव झाला.