नवी दिल्ली : महिला प्रीमियर लीगचे पहिले विजेतेपद पटकावल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या आनंदाला पारावार उरला नाही. मुंबई इंडियन्सचा हा ऐतिहासिक विजय आहे. WPL फायनलमध्ये मुंबई इंडियन्सने चमकदार कामगिरी करताना दिल्ली कॅपिटल्सचा 7 गडी राखून पराभव केला. चॅम्पियनचा किताब मिळाल्यानंतर मुंबईच्या खेळाडूंनी मैदानावर खूप धमाल केली आणि नाचत हा विजय साजरा केला. क्रिकेट स्टेडियममध्ये सर्व खेळाडूंची ही धमाल रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचे नजर लागावी असे सेलिब्रेशन होते. मुंबईच्या या सेलिब्रेशनला सोशल मीडियावर हेडलाइन्स मिळत आहेत.
MI च्या वेगवान गोलंदाजांची शानदार कामगिरी :26 मार्च रोजी डब्ल्यूपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सच्या वेगवान गोलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सला 131 धावांवर रोखले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने ३ गडी गमावून लक्ष्य पूर्ण केले. अशाप्रकारे मुंबईने दिल्लीचा 7 गडी राखून पराभव करीत WPL चॅम्पियनचे विजेतेपद पटकावले. या सामन्यात मुंबईचा फलंदाज नाटे सिव्हरने विजयी चौकार ठोकताच संघातील सर्व खेळाडू मैदानाच्या दिशेने धावू लागले आणि त्यांनी आनंदाने उड्या मारल्या.
मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचे मैदानावरच सेलिब्रेशन :मुंबई इंडियन्सची फलंदाज नाटे सिव्हरने विजयी चौकार ठोकताच MI च्या सर्व खेळाडूंनी मैदानावर धाव घेत, विजयी सोहळा साजरा करायला सुरुवात केली. मग काय मुंबई इंडियन्सचा भव्य सोहळा मैदानावरच सुरू झाला आणि मैदानात चौफेर फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. संघातील सर्व खेळाडू मस्तीने नाचू लागले आणि मैदानावर रात्री उशिरापर्यंत सर्वजण नाचत राहिले. खेळाडूंच्या सेलिब्रेशनचा आणि डान्सचा व्हिडीओ इंटरनेटवर ट्रेंड करीत होता.
हरमनप्रीतने सर्व खेळाडूंसोबत ट्रॉफीचा केला सन्मान :रात्री उशिरापर्यंत हा उत्सव बीसीसीआयचे अध्यक्ष राॅजर बिन्नी आणि बीसीसीआय सचिव जय शाह यांनी कर्णधार हरमनप्रीत कौरला सन्मानपूर्वक WPL ट्रॉफी दिली. यानंतर हरमनप्रीत कौरला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि तिने संघातील सर्व खेळाडूंसोबत ट्रॉफी उचलली. या विजयानंतर सर्व खेळाडू खूप आनंदी दिसत होते. मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षक झुलन गोस्वामीसोबत खेळाडूंनी खूप धमाल केली आणि एवढेच नाही तर खेळाडूंनी टॉफीसोबत डान्सही केला.
हेही वाचा : Bhagwani Devi Bags Gold :याला म्हणतात जिद्द! ९५ वर्षाच्या आजीने अॅथलेटिक्समध्ये जिंकले सुवर्णपदक