नूर सुल्तान - भारताची अव्वल महिला कुस्तीगीर विनेश फोगटने विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत स्वीडनच्या सोफिया मॅटसनचा पराभव करुन विजयी शुभारंभ केला होता. मात्र, त्याला दुसऱ्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. विनेशला जपानच्या खेळाडूने पराभव केला. या पराभवासह विनेशचे विश्व चॅम्पियन होण्याचे स्वप्न भंगले आहे. मात्र, तिला अजूनही रेपेचेजच्या रुपाने 'कांस्य' पदक जिंकता येऊ शकते.
हेही वाचा -विश्व कुस्ती चॅम्पियनशीप : विनेश फोगटचा विजयारंभ, सलामीलाच ऑलिम्पिक विजेतीवर केली मात
५३ किलो वजनी गटात दुसऱ्या फेरीत विनेश फोगटचा सामना जपानच्या मायु मुकाइदा हिच्याशी झाला. या सामन्यात मायुने विनेशचा ०-७ ने पराभव केला. या सामन्यात विशेनला एकही गुण पटकवता आले नाही. एकतर्फी ठरलेल्या सामन्यात मायु हिने बाजी मारली.
हेही वाचा -विश्व कुस्ती चॅम्पियनशिप : भारताचे ४ कुस्तीपटू पहिल्या फेरीत गारद
दरम्यान, या स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताचे ४ कुस्तीपटूचा पराभव झाला त्यानंतर सर्वांच्या नजरा विनेशवर होत्या. मात्र, अखेर विनेशलाही दुसऱ्या फेरीत पराभूत व्हावे लागले आहे.