जेरुसलेम : टायब्रेकर सामन्यात फ्रान्सचा पराभव करीत ( World Team Chess India Beat France ) भारताने फिडे जागतिक सांघिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत प्रवेश ( India Beat France to Enter Last Four ) केला आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये दोन्ही संघ बरोबरीत होते. त्यानंतर ब्लिट्झ टायब्रेकरचा अवलंब ( FIDE World Team Chess Championship ) करण्यात आला. ज्यामध्ये भारताने 2.5-1.5 अशा फरकाने विजय मिळवला. भारताच्या विजयाचे नायक निहाल सरीन आणि एसएल नारायणन होते. ज्यांनी अनुक्रमे ज्युल्स मूसार्ड आणि लॉरेंट फ्रेसिनेट ( Heroes of Indias Victory Nihal Sareen and SL Narayanan ) यांचा पराभव केला.
FIDE World Team Chess Championship : भारताकडून फ्रान्सचा बुद्धिबळ स्पर्धेत पराभव; सेमीफायनलमध्ये केला प्रवेश - भारताच्या विजयाचे नायक निहाल सरीन आणि एसएल नारायणन
भारताने फ्रान्सचा पराभव करून FIDE वर्ल्ड टीम चेस चॅम्पियनशिपच्या ( World Team Chess India Beat France ) उपांत्य फेरीत प्रवेश ( India Beat France to Enter Last Four ) केला. भारताच्या विजयाचे नायक निहाल सरीन आणि एसएल नारायणन ( FIDE World Team Chess Championship ) होते. ज्यांनी अनुक्रमे ज्युल्स मूसार्ड आणि लॉरेंट फ्रेसिनेट यांचा पराभव ( World Team Chess India Beat France ) केला.
भारताचा अव्वल खेळाडू विदित गुजरातीचा उत्तम खेळ :भारताचा अव्वल खेळाडू विदित गुजराती याने फ्रेंच स्टार मॅक्झिम वॅचियर लॅग्रेव्हला ४५ चालींमध्ये बरोबरीत रोखले, तर के शशिकिरणला मॅक्सिम लागार्डने ५५ चालींमध्ये पराभूत केले. अशा स्थितीत सरीन आणि नारायणन यांच्या विजयाने भारताला पुढे जाणे शक्य झाले. उपांत्य फेरीत भारताचा सामना उझबेकिस्तानशी होणार आहे. उझबेकिस्तानने युक्रेनला हरवून अंतिम चारमध्ये प्रवेश केला आहे. याआधी सलामीच्या लढतीत गुजराथीने लॅग्राव्हचा पराभव केला, तर नारायणनने फ्रीसनेटचा पराभव केला.
सरीन आणि शशिकिरण यांनी आपापले गेम ड्रॉ केले :सरीन आणि शशिकिरण यांनी आपापले गेम ड्रॉ केले. ज्यामुळे भारताने हा सामना 3-1 असा जिंकला. फ्रान्सने मात्र दुसरा सामना त्याच फरकाने जिंकून सामना टायब्रेकरपर्यंत खेचला. दुस-या लढतीत लॅग्राव्हने गुजराती तर फ्रेसिनेटने नारायणनचा पराभव केला. सरीन आणि शशिकिरण यांनी पुन्हा बाजी मारली. इतर लढतींमध्ये स्पेनने अझरबैजान आणि चीनचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे, जेथे हे दोन संघ आमने-सामने असतील.