बर्लिन -जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली टेनिसपटू इगा स्वांतेकच्या खांद्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात होणाऱ्या बर्लिन येथे होणाऱ्या बेट्ट ओपन स्पर्धेतून तिने माघार घेतली आहे. तिने म्हटलं की विम्बल्डनपूर्वी जाण्यापूर्वी तिला विश्रांतीची गरज आहे. ट्विट करत इगाने ही माहिती दिली ( Iga Swiatek Pulls Out Of Berling Event ) आहे.
इगा स्वांतेक म्हणाली की, खांद्याचा वारंवार त्रास होत आहे. त्यामुळे दुर्दैवाने मला बर्लिनमधील बेट्ट ओपन स्पर्धेतून माघार घ्यावी लागले. मला माफ करा मी तिथे खेळू शकणार नाही. विम्बल्डन होणाऱ्या स्पर्धेसाठी मी विश्रांतीवर भर देईन, असेही इगाने स्पष्ट केलं.