बर्मिंगहॅम:अभिषेक वर्मा ( Archer Abhishek Verma ) आणि ज्योती सुरेखा वेनम ( Jyoti Surekha Venam ) यांच्या भारतीय मिश्र संघाने 2022 च्या जागतिक क्रीडा स्पर्धेत त्यांच्या मेक्सिकन प्रतिस्पर्ध्यांचा एका गुणाने पराभव करत तिरंदाजीमध्ये कांस्यपदक ( India won bronze medal in archery ) जिंकले. पहिल्या फेरीत आघाडी घेण्यासाठी भारतीय जोडीने चांगली सुरुवात केली, पण अँड्रिया बेसेरा आणि मिगुएल बेसेरा ( Andrea Besera and Miguel Besera ) यांनी दुसऱ्या फेरीत चांगली कामगिरी करत गुणसंख्या बरोबरीत आणली. त्यानंतर अभिषेक आणि ज्योतीने तिसऱ्या फेरीत पुनरागमन केले आणि अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करत कांस्यपदकाचा प्ले-ऑफ सामना 157-156 असा जिंकला.
तिरंदाजी असोसिएशन ऑफ इंडिया ( Archery Association of India ) च्या निवेदनानुसार, जागतिक खेळांमधील हे भारताचे पहिले पदक आहे. तसेच माजी विश्वचषक सुवर्णपदक विजेता अभिषेकचे 50 वे आंतरराष्ट्रीय पदक आहे. सर्व स्तरांवर कंपाऊंड तिरंदाजीमध्ये पदक जिंकणारा अभिषेक हा एकमेव भारतीय तिरंदाज आहे.