यूजीन (अमेरिका) : अमेरिकेत सुरू असलेल्या जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने मोठी कामगिरी केली आहे. मुरली श्रीशंकर लांब उडीच्या अंतिम फेरीसाठी ( Murali Sreesankar long jump finals reached ) पात्र ठरणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याचवेळी 3000 मीटर स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळे ( Runner Avinash Sable ) याने स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अपेक्षेप्रमाणे अंतिम फेरीत धडक मारली आहे. श्रीशंकरने आठ मीटरची सर्वोत्तम उडी मारून ब गटातील पात्रता फेरीत दुसरे आणि एकूण सातवे स्थान पटकावले.
अंजू बॉबी जॉर्ज ही जागतिक चॅम्पियनशिप लांब उडी स्पर्धेत अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय होती. तसेच पॅरिसमधील 2003 च्या आवृत्तीत कांस्यपदक जिंकून पदक जिंकणारी ती पहिली भारतीय ( Anju Bobby George first athlete win medal ) देखील आहे. इतर दोन भारतीय जेस्विन आल्ड्रिन (7.79 मी) आणि मोहम्मद अनीस याहिया (7.73 मी) अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकले नाहीत, ते गट अ पात्रतेमध्ये अनुक्रमे नवव्या आणि 11व्या स्थानावर राहिले.