उलान-उदे (रशिया) - जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत मंजू राणीच्या रुपाने भारतीयांना सुवर्णपदकाची आशा होत्या. मात्र, अंतिम सामन्यात मंजू राणीचा पराभव पराभव झाला. भारतीयांच्या स्वप्नासोबत मंजू राणीचे जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत, पदार्पणातच सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्नही भंगले आहे. ४८ किलो वजनी गटात मंजू राणीला अंतिम फेरीत रशियाच्या एकातेरिना पाल्टसेवाकडून पराभवाचा सामना करावा लागला.
जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धाः भारताच्या १९ वर्षीय मंजू राणीला रौप्यपदक - मंजू राणी
मंजू राणीला अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. याबरोबर मंजू राणीचे जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत, पदार्पणातच सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्नही भंगले आहे.
अंतिम सामन्यात रशियन एकातेरिनाने एकतर्फी वर्चस्व राखले आणि मंजूचा ४-१ ने पराभव केला. मात्र, अंतिम फेरीतल्या पराभवानंतरही मंजू राणीने ऐतिहासीक कामगिरीची नोंद केली आहे. १८ वर्षांनंतर पदार्पणात जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी मंजू पहिली महिला भारतीय खेळाडू ठरली आहे.
दरम्यान, २००१ साली सहा वेळा जगज्जेती ठरलेली भारताची मेरी कोमने अशी कामगिरी केली होती. मंजूच्या पराभवानंतर भारताचे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. या स्पर्धेत भारताकडून मंजू राणीने रौप्य, तर मेरी कोम, जमुना बोरो आणि लवलीना यांनी कांस्य पदकाची कमाई केली.