महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

World Athletics Championships : अन्नू राणीने अंतिम फेरीत मारली धडक - क्रिडाच्या बातम्या

अन्नूने 59.60 मीटर भालाफेक करून अंतिम फेरीत स्थान ( Annu Rani enters the finals ) मिळवले. अन्नू ही भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत सलग दुसऱ्यांदा पोहोचणारी पहिली भारतीय आहे.

Annu Rani
अन्नू राणी

By

Published : Jul 22, 2022, 4:52 PM IST

नवी दिल्ली: भालाफेकमध्ये भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळू शकते. अन्नू राणीने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अन्नूने 59.60 मीटर भालाफेक करत अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. अन्नू ही भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत सलग दुसऱ्यांदा पोहोचणारी पहिली भारतीय ( First Indian reach second time final ) आहे. त्याने यापूर्वी 2019 मध्ये दोहा येथे झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या पात्रता फेरीत आठव्या क्रमांकावर राहून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

भालाफेकपट्टू अन्नू राणीने ( Javelin thrower Annu Rani ) तिच्या कामगिरीवर थोडी नाखूष आहे. ती म्हणते की हे तिचे सर्वोत्कृष्ट नाही, तिला पाहिजे तसे प्रदर्शन करता आले नाही. 2018 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अन्नूने 53.93m च्या निराशाजनक कामगिरीसह सहावे स्थान पटकावले आणि तिच्या कारकिर्दीच्या या कठीण टप्प्यातून बाहेर पडण्यासाठी तिला समुपदेशन आणि प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्याची गरज पडली होती.

ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा ( Olympic champion Neeraj Chopra ) शुक्रवारी पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेच्या अ गटात पात्रता फेरीत सहभागी होणार आहे. टोकियो गेम्सचे रौप्यपदक विजेते चेक प्रजासत्ताकचे जेकोब जेकोब व्दलेच आणि 2012 लंडन ऑलिम्पिक सुवर्ण विजेते त्रिनिदाद आणि टोबॅगोचे केशोर्न वॉल्कोट त्यांच्या गटात असतील. ग्रेनेडाचा गतविजेता अँडरसन पीटर्स पात्रता गट ब मध्ये खेळणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी होणार आहे.

हेही वाचा -Kl Rahul covid19 Positive : वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी टीम इंडियाला धक्का, केएल राहुलला कोरोनाची लागण

ABOUT THE AUTHOR

...view details