दोहा (कतार)- जगामध्ये सर्वाधिक वेगवान धावपटू म्हणून उसेन बोल्टची ख्याती आहे. त्याने अनेक विक्रमही प्रस्थापित केले आहेत. या विक्रमातील एक विक्रम विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये मोडित निघाला आहे. अमेरिकेच्या एलिसन फेलिक्सनेच सोमवारी बोल्टचा विक्रम मोडला आहे.
विजयानंतर संघासोबत आनंद व्यक्त करताना एलिसन फेलिक्स... हेही वाचा -विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप : भारतीय रिले संघ सातव्या स्थानी, अमेरिकेने जिंकले सुवर्ण
दोहा येथे सुरू असलेल्या विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत एलिसन फेलिक्सने ४ बाय ४०० मीटर मिश्र रिले प्रकारात संघाला सुवर्णपदक जिंकून देताना बोल्टचा विक्रम मोडला. या सुवर्णपदकासह तिने विविध स्पर्धेत सर्वाधिक १२ सुवर्णपदकं जिंकण्याची किमया केली आहे. यापूर्वी बोल्टने ११ सुवर्णपदकं जिंकली आहेत. त्यांच्या हा विक्रम फेलिक्सने मोडला आहे. दरम्यान, उसेन बोल्टन २०१७ मध्ये अखेरच्या स्पर्धेत उतरला होता.
हेही वाचा -विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप : द्युती पहिल्या फेरीत गारद, जाबीरची 'धाव' उपांत्य फेरी संपुष्टात
अमेरिकेच्या मिश्र रिले संघाने ३ मिनिटे ९.४३ सेकंदात विश्वविक्रमाची नोंद करताना सुवर्णपदक जिंकले. महत्वाची बाब म्हणजे, फेलिक्सने गतवर्षी नोव्हेंबरमध्ये मुलीला जन्म दिला आहे. यानंतर ती पहिल्यांदाच स्पर्धेत सहभागी झाली आहे.