महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

विश्व अ‌ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप : द्युती पहिल्या फेरीत गारद, जाबीरची 'धाव' उपांत्य फेरी संपुष्टात - एमपी जाबीर विषयी बातमी

विश्व अ‌ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय धावपटू द्युती चंदची कामगिरी निराशजनक राहिली. शनिवारी महिला गटात १०० मीटरची स्पर्धा पार पडली. द्युतीने हे १०० मीटर अंतर ११.४८ सेकंदामध्ये पार केले. मात्र, तिने घेतलेला वेळ अधिक असल्याने, तिचे आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात आले आहे.

विश्व अ‌ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप: द्युती पहिल्या फेरीत गारद, जाबीरची 'धाव' उपांत्य फेरी संपुष्टात

By

Published : Sep 29, 2019, 5:11 PM IST

दोहा (कतार)- येथे सुरू असलेल्या विश्व अ‌ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय धावपटू द्युती चंदची कामगिरी निराशजनक राहिली. शनिवारी महिला गटात १०० मीटरची स्पर्धा पार पडली. द्युतीने हे १०० मीटर अंतर ११.४८ सेकंदामध्ये पार केले. मात्र, तिने घेतलेला वेळ अधिक असल्याने, तिचे आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात आले आहे.

विश्व अ‌ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप: द्युती पहिल्या फेरीत गारद

हेही वाचा -विश्व अ‌ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप : भारतीय रिले संघ अंतिम फेरीत दाखल

दरम्यान, या स्पर्धेत द्युती चंदकडून चांगल्या कामगिरीची आपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, द्युतीला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. विश्व अ‌ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत द्युती ४७ खेळाडूंमध्ये ३७ व्या स्थानावर राहिली.

हेही वाचा -मराठमोळ्या राहुल आवारेची विक्रमी कामगिरी; जागतिक क्रमवारीत पटकावले दुसरे स्थान

पुरुष गटाच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीत भारताचा एमपी जाबीरला उपांत्य फेरी पार करता आली नाही. जाबीरने ४०० मीटरचे अंतर ४९.७१ सेंकदामध्ये पार केले. मात्र, तो १६ व्या स्थानावर राहिला.

जाबीरची 'धाव' उपांत्य फेरी संपुष्टात

ABOUT THE AUTHOR

...view details