महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा : मेरी कोम एकतर्फी विजयासह उपउपांत्य फेरी

जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताची मेरी कोमला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली. त्यानंतर उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मेरी कोमने थायलंडच्या जुटामास जिटपाँगशी दोन हात केले. या सामन्यात मेरी कोमने जुटामासला गुण घ्यायची संधी दिली नाही. तिने हा सामना ५-० ने एकतर्फी जिंकला.

जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा : मेरी कोमने एकतर्फी विजयासह गाठली उपउपांत्य फेरी

By

Published : Oct 8, 2019, 5:25 PM IST

उलान-उदे (रशिया) - भारताची अव्वल महिला बॉक्सर ए. सी. मेरी कोमने जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये शानदार खेळाचे प्रदर्शन केले. सहा वेळा जगज्जेती ठरलेली मेरी कोमने ५१ किलो वजनी गटात उपउपांत्य फेरी गाठली आहे. मेरी कोमने उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात थायलंडची बॉक्सर जुटामास जितपाँगचा ५-० असा एकतर्फी पराभव केला.

जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताची मेरी कोमला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली. त्यानंतर उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मेरी कोमने थायलंडच्या जुटामास जिटपाँगशी दोन हात केले. या सामन्यात मेरी कोमने जुटामासला गुण घ्यायची संधी दिली नाही. तिने हा सामना ५-० ने एकतर्फी जिंकला.

मेरी कोम सरावादरम्यान...

दरम्यान, या विजयासह ३६ वर्षीय मेरी कोमने सातव्या जेतेपदाकडे पाऊल टाकले आहे. मेरी कोम फक्त भारतातच नव्हे तर विश्व बॉक्सिंगचेही प्रेरणास्थान आहे. सहा वेळा सुवर्णपदकावर नाव कोरल्यानंतर मेरी कोम आता रशियाच्या भूमीतही नव्या विक्रमाला गवसणी घालण्यासाठी सज्ज आहे. याच दृष्टीने मेरी कोमची वाटचाल सुरू असून तिने उपउपांत्य फेरी गाठली आहे.

हेही वाचा -जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा : एका मंजूचा पराभव तर, दुसरी मंजू उपांत्यपूर्व फेरीत

हेही वाचा -विश्व अ‌ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप : भारत ५८ व्या स्थानी तर, २९ पदकांसह अमेरिका प्रथम

ABOUT THE AUTHOR

...view details