नवी दिल्ली : महिला प्रीमियर लीग 2023 चा पहिला हंगाम संपला आहे. WPL 2023 चे विजेतेपद जिंकून मुंबई इंडियन्सने इतिहासात आपले नाव नोंदवले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने WPL मधील मुंबई इंडियन्स तसेच या लीगमधील दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघांवर पैशांचा वर्षाव केला. डब्ल्यूपीएलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्स आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या यूपी वॉरियर्सने या हंगामात चांगली कामगिरी केली. पण, डब्ल्यूपीएलमध्ये मुंबई इंडियन्स चॅम्पियन ठरली.
दिल्ली कॅपिटल्सला ऑरेंज कॅप पुरस्कार :मुंबई इंडियन्स संघात खेळणाऱ्या इंग्लंडच्या स्टार फलंदाज नॅट सीव्हर ब्रंटने या खेळाडूने चमकदार कामगिरी केली. तिने या सामन्यातील 19.3 षटकांत शेवटचे विजयी चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. या हंगामात सर्वच संघांनी मेहनत घेतली. मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सला डब्ल्यूपीएलच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पण, मेग लॅनिंगने या लीगमध्ये एकूण 345 धावा केल्या. यासाठी मेग लॅनिंगला ऑरेंज कॅप पुरस्कारही मिळाला आहे.
महिला प्रीमिअर लीग 2023 चे चॅम्पियन ठरलेली मुंबई इंडियन्स
वेगवान गोलंदाज हॅली मॅथ्यूजला पर्पल कॅप :या संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक 16 विकेट घेतल्याबद्दल मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज हॅली मॅथ्यूजला पर्पल कॅपने सन्मानित करण्यात आले. मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणाऱ्या यास्तिका भाटियाने आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर 'इमर्जिंग प्लेअर ऑफ द टूर्नामेंट'चा किताब पटकावला आहे. यासह अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावणाऱ्या नॅट सीवर ब्रंटची डब्ल्यूपीएलमधील खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. आता आम्ही तुम्हाला सांगतो की WPL च्या या हंगामात कोणाला किती बक्षीस रक्कम आणि कोणता पुरस्कार मिळाला आहे. हे जाणून घेण्यासाठी, ही संपूर्ण यादी पाहा.
वुमेन्स प्रीमिअर लीगमध्ये कोणाला कोणते बक्षीस मिळाले पाहा याची यादी
MI ची कर्णधार हरमनप्रीत कौरने व्यक्त केला आनंद :अंतिम सामन्यातील विजयाचा चांगला अनुभव आला आहे. आम्ही इतकी वर्षे या क्षणाची वाट पाहत होतो. ड्रेसिंग रूममध्ये सर्वांनी या विजयाचा आनंद लुटला. इथल्या प्रत्येकासाठी हे स्वप्नवत वाटतं. बरेच लोक विचारत होते की WPL कधी येईल आणि तो दिवस आला आणि त्याचा चॅम्पियन होण्याचा आम्हाला खूप आनंद आहे तसेच अभिमानदेखील आहे. माझ्या टीममधी सर्व खेळाडूंनी छान कार्य केले याबद्दल मला खूप आनंद आहे. माझ्या मते सकारात्मक राहणे महत्त्वाचे आहे. टॉस आमच्या बाजूने गेल्याने आम्ही भाग्यवान ठरलो होतो. आपल्या सर्वांसाठी हा एक खास क्षण आहे. मी खूप दिवसांपासून याची वाट पाहत होते आणि आज मला माहिती आहे की जिंकताना काय वाटते, असे हरमनप्रीतने हसत माध्यमांना बोलताना सांगितले.
हेही वाचा : Olympics Gold Medallist Neeraj Chopra : नीरज चोप्राची मुलांना सरप्राईज भेट; पाहा काय दिला संदेश