तेरेसा (स्पेन): भारतीय महिला हॉकी संघाने ( Indian Women's Hockey Team ) मंगळवारी एफआयएच महिला विश्वचषक हॉकी चॅम्पियनशिपमध्ये ( FIH Womens World Cup Hockey Championship ) आपला पहिला विजय नोंदवला. भारताने कॅनडाचा पराभव करून पहिला विश्वचषक सामना जिंकला. सामन्याच्या वेळेपर्यंत दोन्ही संघांचा स्कोअर 1-1 असा होता. भारतीय संघाने शूटआऊटमध्ये कॅनडाचा 3-2 असा पराभव केला ( India beat canada by 3-2 goals ) आणि स्पर्धेत 9-12वे स्थान पटकावले.
स्पेनविरुद्धच्या क्रॉसओव्हर सामन्यात 0-1 ने पराभूत झाल्यानंतर भारताने या विजयासह उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. कॅनडासाठी मॅडलिन सेकौने 11व्या मिनिटाला, तर सलीमा टेटेने 58व्या मिनिटाला गोल ( Salima Tete goal in 58th minute ) करत भारताला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. कर्णधार सविताने शानदार कामगिरी केली, तर नवनीत कौर, सोनिका आणि नेहा यांनीही चांगली कामगिरी करून भारताला विजय मिळवून दिला.