महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Womens FIH Nations Cup : भारताकडून शूटआऊटमध्ये आयर्लंडचा पराभव; अंतिम फेरीत केला प्रवेश - भारताकडून शूटआऊटमध्ये आयर्लंडचा पराभव

महिला राष्ट्रीय कपमध्ये भारताने शूटआऊटमध्ये आयर्लंडचा ( India Defeated Ireland 2-1 in Shootout ) पराभव करीत ( India Defeated Ireland ) अंतिम फेरीत प्रवेश केला ( FIH Hockey Womens National Cup ) आहे. महिला FIH नेशन्स कपमध्ये भारताने आयर्लंडला हरवून अंतिम फेरी गाठली ( Udita Scored Equalizer For India in 45th Minute ) आहे.

Womens FIH Nations Cup
भारताकडून शूटआऊटमध्ये आयर्लंडचा पराभव; अंतिम फेरीत केला प्रवेश

By

Published : Dec 17, 2022, 2:36 PM IST

Updated : Dec 17, 2022, 3:10 PM IST

व्हॅलेन्सिया : भारताने शुक्रवारी पेनल्टी शूटआऊटमध्ये आयर्लंडचा 2-1 असा पराभव ( India Defeated Ireland 2-1 in Penalty Shootout ) करून FIH हॉकी महिला राष्ट्रीय कपच्या ( India Defeated Ireland ) अंतिम फेरीत प्रवेश ( FIH Hockey Womens National Cup ) केला. अंतिम फेरीत भारताचा सामना स्पेनशी होणार आहे. सामन्याच्या नियमित वेळेपर्यंत दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत होते. भारतासाठी उदिताने ४५व्या मिनिटाला बरोबरीचा ( Udita Scored Equalizer For India in 45th Minute ) गोल केला. तत्पूर्वी, 13व्या मिनिटाला नाओमी कॅरोलने आयर्लंडला आघाडी मिळवून दिली.

भारताकडून लालरेमसियामी आणि सोनिका यांचे गोल :शूटआऊटमध्ये भारताकडून लालरेमसियामी आणि सोनिका यांनी गोल केले, तर आयर्लंडसाठी हॅना मॅकलॉफलिनने गोल केले. भारतीय महिला हॉकी संघाचा एफआयएच महिला राष्ट्र चषक स्पर्धेतील हा सलग चौथा विजय आहे. 14 डिसेंबर रोजी भारताने दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला. पूल-ब मधील हा सामना जिंकून संघाने गटात पहिल्या क्रमांकावर मजल मारली होती. भारताकडून दीप ग्रेस एक्का आणि गुरजित कौर यांनी प्रत्येकी एक गोल केला.

भारताने यापूर्वी चिलीचा ३-१ आणि जपानचा २-१ ने केला पराभव :जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या भारताने यापूर्वी चिलीचा ३-१ आणि जपानचा २-१ असा पराभव केला होता. या आठ संघांच्या स्पर्धेतील विजेत्याला 2023-24 FIH हॉकी महिला प्रो लीगमध्ये पदोन्नती दिली जाईल. पुढील वर्षीच्या आशियाई खेळ आणि 2024 पॅरिस ऑलिम्पिकच्या आधी FIH हॉकी महिला प्रो लीग ही एक महत्त्वाची स्पर्धा असेल.

Last Updated : Dec 17, 2022, 3:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details