विम्बल्डन : विम्बल्डन 2023 ग्रँड स्लॅम स्पर्धा शेवटच्या टप्प्यात सुरू आहे. या सामन्यांमध्ये नोव्हाक जोकोव्हिचे वर्चस्व मोडीत निघाले आहे. रविवारी झालेल्या सामन्यात स्पेनचा 20 वर्षीय टेनिसपटू कार्लोस अल्कराझने जोकोव्हिचला धूळ चारली. जोकोव्हिचला पराभूत करत अल्कराझने आपल्या कारकीर्दमधील विम्बल्डन स्पर्धेचे विजेतेपद पटाकवले आहे. अल्कराझ ऑल इंग्लंड क्लबच्या स्पर्धेत जोकोव्हिचला पराभूत करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. जोकोव्हिच सेंटर कोर्टवर 45 सामन्यानंतर पराभूत झाला आहे.
Wimbledon 2023 Mens Singles Final : विम्बल्डन ग्रँडस्लॅममध्ये कार्लोस अल्कराझने रचला इतिहास, जोकोव्हिचला चारली पराभवाची धूळ
विम्बल्डन 2023 ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या पुरुषाच्या एकेरी अंतिम लढतीत अल्कराझने 3 ग्रँडस्लॅम विजेत्या जोकोव्हिचला पराभूत केले आहे. अल्कराझ ऑल इंग्लंड क्लबच्या स्पर्धेत जोकोव्हिचला पराभूत करणारा पहिला खेळाडू ठरला. जोकोव्हिच आणि अल्काराझ हे आतापर्यंत दोनदा आमने-सामने आले आहेत.
असा झाला सामना : पुरुषाच्या एकेरी अंतिम लढतीत अल्कराझने 23 ग्रँडस्लॅम विजेत्या जोकोव्हिचवर 1-6, 7-6 (8-6), 6-1, 3-6, 6-4 असा विजय मिळविला. जोकोव्हिचला पराभूत करणारा अल्कराझने मागील वर्षी अमेरिकन खुली स्पर्धा जिंकली होती. दरम्यान रविवारी झालेल्या सामन्यात नोव्हाक जोकोव्हिचने पहिला सेट 6-1 असा जिंकला होता. यानंतर दुसऱ्या सेटमध्ये अल्काराझने आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर जबरदस्त सामन्यात पुनरागमन केले. हा सेट एका क्षणी 6-6 असा पोहोचला होता. यानंतर टायब्रेकर खेळला गेला, जो अल्काराझने 8-6 असा जिंकला. त्यानंतर अल्काराझने 7-6 असा सेट जिंकला. यानंतर तिसऱ्या सेटमध्येही 20 वर्षीय स्पॅनिश खेळाडूने अप्रतिम खेळ करत आपल्यापेक्षा अनुभवी जोकोव्हिचचा 6-1 असा पराभव केला.
आतापर्यंत दोनदा आमने-सामने :जोकोव्हिच आणि अल्काराझ हे आतापर्यंत दोनदा आमने-सामने आले आहेत. जोकोव्हिचने एकामध्ये तर अल्काराझने एका सामन्यात विजय मिळवला आहे. विम्बल्डन 2023 फायनलपूर्वी, यावर्षी पॅरिसमध्ये झालेल्या फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत दोघेही एकमेकांसमोर आले होते. त्यादरम्यान जोकोव्हिचने क्ले कोर्टवर स्पॅनिश खेळाडू अल्कराझचा 6-3, 5-7, 6-1, 6-1 असा पराभव केला. याशिवाय अल्काराझला त्या सामन्यात दुखापत झाली होती. मात्र त्याने संपूर्ण सामना खेळला होता. सामना झाल्यानंतर जोकोव्हिचने अल्कराझचे कौतुक केले आहे. तू अप्रतिम सर्व्हिस केली आणि महत्त्वाच्या क्षणी पाईंट्स मिळवले. त्यामुळे तू हा सामना जिंकणे हा योग्यच निकाल आहे. तुझे अभिनंदन, मला लाल मातीच्या आणि हार्ड कोर्टवर तुझ्याविरुद्ध खेळताना आव्हान जाणवत होते. आता ग्रास कोर्टवरही तू चांगला खेळ करत आहेस, अशा शब्दांमध्ये जोकोव्हिचने अल्कराझचे कौतुक केले.