महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Wimbledon 2022: राफेल नदालने वेदनांच्या अडथळ्यावर मात करून गाठली उपांत्य फेरी - विम्बल्डन 2022

22 वेळचा प्रमुख चॅम्पियन नदालने दुसऱ्या सेटमध्ये मेडिकल टाइमआउटसाठी कोर्ट सोडले. ( Wimbledon 2022 ) सुरुवातीचा सेट 3-6 असा गमावल्यानंतर, आणि चार तास, 20 मिनिटांच्या उपांत्यपूर्व फेरीत मध्यभागी तो पोटाच्या समस्येशी झुंजत असल्याचे दिसून आले. मात्र या सगळ्यावर मात करुन नदालने उपांत्य फेरी ( Rafa Nadal reaches semifinals ) गाठली.

राफेल नदाल
राफेल नदाल

By

Published : Jul 7, 2022, 10:20 AM IST

लंडन: राफेल नदालने दुखापतीपुढे शरणागती पत्करली नाही. नदाल विम्बल्डन चॅम्पियनशिपमध्ये पुन्हा एकदा पुरुष एकेरीच्या उपांत्य ( Rafa Nadal reaches semifinals ) फेरीत पोहोचून पाच सेटमध्ये अमेरिकन टेलर फ्रिट्झला रोखून धरले. 22 वेळचा चॅम्पियन नदालने दुसर्‍या सेटमध्ये मेडिकल टाइमआउटसाठी कोर्ट सोडला. सुरुवातीचा सेट 3-6 असा गमावला. चार तास, 20 मिनिटांच्या उपांत्यपूर्व फेरीत नदालला पोटदुखीचा त्रास झाला. मात्र नदालने आशा सोडली नाही.

( Wimbledon 2022 ) विंबल्डनच्या सामन्यात नदालने लवचिकता दाखवली, गुण कमी ठेवण्यासाठी आक्रमकता वाढवली आणि 3-6, 7-5, 3-6, 7-5, 7-6 फरकाने विजयावर शिक्कामोर्तब केले. "शरीर, सर्वसाधारणपणे, ठीक आहे, परंतु अर्थातच, पोटात काहीतरी गडबड आहे," नदालने सामना संपल्यानंतर हे सांगितले. सामना मध्येच सोडून द्यावा लागेल, असे त्याने सांगितले.

पण कोर्टवर परत येताच प्रेक्षकांचा उत्साह त्याने कमी होऊ दिला नाही. त्याला जेव्हा जेव्हा पॉइंट मिळायचा तेव्हापासून वाइल्ड चीअरिंग त्याच्यासोबत असायची. नदालने 11व्या गेममध्ये ब्रेक मारून दुसरा सेट 7-5 असा जिंकला. परंतु फ्रिट्झने प्रचंड सर्व्हिस आणि मोठ्या फोरहँडसह पुढील सेटवर वर्चस्व राखले.

24 वर्षीय अमेरिकन खेळाडूने आणखी 6-3 असा विजय मिळवून आगेकूच केली. परंतु नदालने किलर इन्स्टिंक्टने चौथा सेट 7-5 असा जिंकून पुन्हा पुनरागमन केले. निर्णायक सेटमध्ये दोघांनी एकदा ब्रेक केला आणि 6-6 पर्यंत बरोबरी साधली. नदालने सनसनाटी सुरुवात करत टायब्रेकमध्ये ५-० अशी आघाडी घेतली आणि ती १०-४ अशी मॅच गुंडाळली.

जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन आणि जूनमध्ये फ्रेंच ओपन जिंकणारा नदाल ग्रास-कोर्टमध्ये 2022 ग्रँडस्लॅमसाठी आपले आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचा पुढचा प्रतिस्पर्धी निक किर्गिओस आहे. त्याने चिलीच्या क्रिस्टियन गॅरिनचा 6-4, 6-3, 7-6(5) असा पराभव करून प्रथमच ग्रँडस्लॅमच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

परंतु नदालने सांगितले की तो शुक्रवारी उपांत्य फेरीत खेळेल याची खात्री देऊ शकत नाही. कारण तो गुरुवारी काही चाचण्यांसाठी जाणार आहे. नदालने बुधवारी सांगितले की, मला आशा आहे की मी खेळण्यासाठी तयार आहे. "निक सर्व स्तरांवर एक उत्कृष्ट खेळाडू आहे, परंतु विशेषत येथे गवतावर जरा अवघड आहे. पण प्रयत्न करणार असल्याचे नदाल म्हणाला.

ABOUT THE AUTHOR

...view details