टोकियो - यंदाचा ऑलिम्पिक कोरोना व्हायरसच्या सावटा खाली होत आहे. यामुळे ऑलिम्पिकसाठी खास नियमावली तयार करण्यात आली आहे. व्हायरसचा धोका पाहता खेळाडूंसाठी कठोर नियम तयार करण्याते आले आहेत. यंदाचा हा ऑलिम्पिक मागील सर्व ऑलिम्पिकपेक्षा वेगळा असणार आहे. ऑलिम्पिकची सुरूवात उद्या 23 जुलैपासून होणार आहे. तर याची सांगता 8 ऑगस्टला आहे. दरम्यान, जपानमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे ऑलिम्पिकच्या आयोजकांनी अनेक नियम बनवले आहे. यादरम्यान, मागील ऑलिम्पिकपेक्षा टोकियो ऑलिम्पिक कसा वेगळा आहे, जाणून घ्या...
उद्धाटन आणि सांगता सोहळ्याची रंगत कमी
कोरोनामुळे उद्धाटन सोहळा पाहण्यासाठी प्रेक्षकांना मैदानावर हजर राहता येणार नाही. रियो, लंडन आणि बिजींग ऑलिम्पिकमध्ये शानदार उद्धाटन सोहळा झाला होता. ज्यात हजारो कलाकारांनी प्रेक्षकांनी तुंडूब भरलेल्या स्टेडियममध्ये कला सादर करत उद्धाटन सोहळ्याची रंगत वाढवली होती. यंदा हा सोहळा कमीत कमी खेळाडूंच्या उपस्थितीत होणार आहे. अधिकाऱ्यांनी जानेवारीमध्ये सांगितलं होत की, उद्धाटन सोहळ्यात 11 हजार अॅथलेटिक्सपैकी 6 हजार अॅथलेटिक्स सहभागी होतील.
स्वत:च घालावं लागेल पदक -
टोकियो ऑलिम्पिकमध्ये विजयी अॅथलेटिक्सना स्वत:चे पदक स्वत:च घालावे लागणार आहे. याशिवाय अॅथलेटिक्स त्या पदकाचं चुंबन देखील घेऊ शकणार नाहीत. तसेच अॅथलेटिक्सना मंचावर मास्क घालणे अनिर्वाय आहे. ऑलिम्पिकमध्ये कोरोनाच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी सतर्कता बाळगली जात आहे.
विनाप्रेक्षक होणार टोकियो ऑलिम्पिक -