नवी दिल्ली : चित्रपटात काम केलेली सपना गिल जी तिच्या चित्रपट आणि सोशल मीडियाच्या पोस्टमुळे एवढी प्रसिद्धीच्या झोतात आली नाही. परंतु, तिचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉसोबतच्या वादानंतर अधिकच चर्चेत आली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे ती खूपच प्रसिद्ध झाली, गुगल ट्रेंडला तिचे खूप मोठे सर्चिंग होऊ लागले. कारण तिने भारताचा स्टार क्रिकेटपटू पृथ्वी शॉसोबत रस्त्यातच सेल्फीवरून वाद घातला. या व्हायरल पोस्टमुळे अचानक लोकांनी तिचा शोध सुरू केला आहे. गुगल ट्रेंडसह सर्व ठिकाणी तिचा सतत शोध घेतला जात आहे.
सपना इंस्टाग्रामवर सक्रिय :आम्ही तुम्हाला सांगतो की, सपना गिल एक फिल्म अभिनेत्री तसेच सोशल मीडियावर सतत पोस्ट टाकून प्रभावित करणारी आहे. ती इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते. सध्या तिच्या इंस्टाग्रामवर 2,20,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स पाहायला मिळतात. सपना गिलने इंस्टाग्रामवर आतापर्यंत 1,471 पोस्ट केल्या आहेत, ज्यावर भरपूर कमेंट्स आणि लाईक्स आले आहेत. ज्यावरून तिची सोशल मीडियावरील सक्रियता दिसून येते. मिळालेल्या माहितीनुसार, सपना गिलने काशी अमरनाथ तसेच निरहुआ चल लंडन आणि मेरा वतनमध्ये काम केले आहे. रवी किशन आणि दिनेश लाल यादव यांच्या अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये ती दिसली आहे.
कोण आहे सपना गिल, का घातला तिने पृथ्वी शाॅबरोबर वाद; 'या' कारणामुळे ती आली गुगल ट्रेंडला सपना आणि तिच्या मित्रांवर गुन्हा :सपना गिल ही चंदिगडची रहिवासी आहे. भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉसोबत सेल्फी घेण्यावरून झालेल्या वादानंतर तिच्याविरुद्ध मुंबईच्या ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपनाशिवाय 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी 2 नामांकित आहेत (शोभित ठाकूर आणि सना उर्फ सपना गिल) आणि 6 अज्ञात आहेत. या वादाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पृथ्वी शॉ आणि मुलीमध्ये भांडण होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींवर खंडणी व बेकायदेशीरपणे एकत्र येणे असे गुन्हे दाखल आहेत.
असे आहे संपूर्ण प्रकरण : गुरुवारी क्रिकेटर पृथ्वी शॉ सांताक्रूझमधील डोमेस्टिक एअरपोर्टजवळील एका हॉटेलमध्ये त्याचा बिझनेसमन मित्र आशिष यादवसोबत जेवायला गेला होता. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अज्ञात व्यक्ती सेल्फीसाठी शॉ यांच्याकडे आली तेव्हा ही घटना घडली. सुरुवातीला क्रिकेटपटूने त्या व्यक्तीला तसे करण्याची परवानगी दिली. तथापि, जेव्हा त्या व्यक्तीने त्याच्यासोबत अधिक सेल्फी घेण्याचा आग्रह केला तेव्हा शॉने विनंती नाकारली, असे अधिकाऱ्याने सांगितले. यानंतर आरोपींनी पृथ्वीबरोबर मोठा वाद घालण्यास सुरुवात केली.
हेही वाचा : Chetan Sharma Resign : स्टिंग ऑपरेशनच्या वादानंतर चेतन शर्मा यांचा तत्काळ राजीनामा; क्रिकेट विश्वात खळबळ