महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Captain Harmanpreet Bad Luck : आम्ही सामन्यात विजयाच्या दिशेने असताना, मी ज्या प्रकारे रनआऊट झाले त्यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही : हरमनप्रीत कौर - Ind Vs Aus Semi Final

आयसीसी महिला विश्वचषक 2023 मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया उपांत्यपूर्व सामना खेळला गेला. भारताने या सामन्यात शेवटपर्यंत जोरदार लढत दिली. परंतु, दुर्दैवाने टीम इंडियाचा अवघ्या 5 धावांनी पराभव झाला. कर्णधार हरमनप्रीत आणि जेमिमाह राॅड्रीग्सने सामन्यात जिंवतपणा आणला होता. परंतु, तरीही झालेल्या पराभवावर कर्णधार हरमनप्रीत कौरने दुःख केले आहे.

ICC Women's World Cup 2023
भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया सेमीफायनल

By

Published : Feb 24, 2023, 1:39 PM IST

हैद्राबाद :आज झालेल्या विश्वकपर सेमिफायनलमध्ये भारताचा अवघ्या 5 धावांनी पराभव चाहत्यांच्या जिव्हारी लागला. दुर्दैव काय असते, ते आज पाहायला मिळाले. कर्णधार हरमनप्रीतची तडफदार बॅटींग पाहून असे वाटत होते भारत आता विजयाच्या दारात आहे. हरमनप्रीत आणि जेमिमाह राॅड्रीग्सने विजय खेचून आणला होता. परंतु, हाय रे दुर्दैव! हरमनप्रीत पिचवर सेट झाली असताना, रनआऊट होणे म्हणजे तोंडातला घास हिरावून नेल्यासारखे झाले.

नेमके कसे घडले नाट्य : भारताची सुरुवात खराब झाल्यानंतर जेमिमाह राॅड्रीग्सने संघाची कमान सांभाळत धुवांधार फटकेबाजी करीत टीम इंडियाच्या धावसंख्येला चांगला आकार दिला. त्यानंतर आलेल्या कर्णधार हरमनप्रीत कौरसुद्धा चांगल्या फाॅर्ममध्ये खेळत होते. दोघीही आता मॅच जिंकून देणार अशी आशा निर्माण झाली होती. परंतु, दुर्दैव असे की, जेमिमाह एक उत्तुंग फटका मारताना झेलबाद झाली आणि भारताची दुर्दैव सुरू झाले. कर्णधार हरमनप्रीत क्रिझवर होती, त्यामुळे भारताला पूर्ण आशा होती. ती मैदानावर चौफेर टोलेबाजी करीत होती, ती चांगल्या फाॅर्ममध्ये असताना अशाप्रकारे रनआऊट झाली की, विश्वासच बसत नव्हता. दुर्दैव काय असते, ते मैदानावर पाहायला मिळाले.

बॅट मातीत अडकली :हरमनप्रीत जबरदस्त फटकेबाजी करीत होती. एका जोरदार फटक्यावर दुसरी धाव घेताना हरमनप्रीतची बॅट मातीत अडकली, बॅट पुढे सरकलीच नाही. त्यामुळे परफेरक्ट आलेल्या थ्रोने तिला रनआऊट केले. काय भारताचे नशीब, हातात आलेला सामना केवळ एका चुकीने गेला. याच ठिकाणी पूर्ण सामना फिरला. नंतर आलेल्या फलंदाज काहीही विशेष छाप पाडू शकले नाहीत. ते जोरदार फटके मारण्याच्या नादात बाद झाले. तरीही भारताने सामना शेवटपर्यंत रोमांचक मोडमध्ये नेला. दुर्दैवाने भारताचा अवघ्या पाच धावांनी पराभव झाला.

हरमनप्रीतचे दुर्दैवी रनआऊटने सामना फिरला

हरमनप्रीत ढसाढसा रडली : कर्णधार हरमनप्रीतने सामन्यानंतर सांगितले, मी आणि जेमी फलंदाजी करीत असताना आम्ही टीम इंडियाला विजयाच्या दारात नेले होते. आम्ही ज्याप्रकारे सामन्यात गती परत मिळवली, आम्हाला आशा निर्माण झाली होती. परंतु, यापेक्षा दुर्दैवी काहीच असू शकत नाही की, आम्हाला तरीसुद्धा पराभवाचा सामना करावा लागला. एवढ्या प्रयत्नानंतर हार, आम्हाला याची अपेक्षाच नव्हती. मी ज्या प्रकारे रनआउट झाले, त्यापेक्षा दुर्दैवी काहीच असू शकत नाही. प्रयत्न करणे अधिक महत्त्वाचे होते आणी आम्ही शेवटच्या चेंडूपर्यंत लढण्याबाबत चर्चा केली होती. निकाल आमच्या वाट्याला आला नाही, पण आम्ही या स्पर्धेत ज्या प्रकारे खेळलो त्यामुळे मी आनंदी आहे. आम्ही लवकर विकेट गमावल्या तरीही आमच्याकडे चांगली फलंदाजी आहे हे आम्हाला माहीत आहे.

राॅड्रीग्सची तडफदार खेळी :आज जेमीने ज्या प्रकारे फलंदाजी केली त्याचे श्रेय जेमीला द्यायलाच हवे. भारतीय संघ ज्या गतीच्या शोधात होता, ती गती तिने आम्हाला मिळवून दिली. अशी कामगिरी पाहून आनंद होतो. खेळाडूचा नैसर्गिक खेळ पाहून आनंद होतो. आम्ही आमच्या ताकदीनुसार खेळलो नसलो तरीही आम्ही उपांत्य फेरीत पोहोचलो. आम्ही ते सोपे झेल सोडले. त्याचे आम्हाला मोठे नुकसान भरावे लागले. जेव्हा तुम्हाला जिंकायचे असते, तेव्हा सर्व बाजू मजबुतीने मैदानात उतरावे लागते. आम्ही चुकीचे क्षेत्ररक्षण हेसुद्धा एक प्रमुख कारण होते

भारतीय संघाची फलंदाजी : भारतीय संघाची सुरुवात थोडी निराशाजनक राहिली. टीम इंडियाची सलामीची जोडी लवकरच आऊट झाली. भारताची स्टार फलंदाज स्मृती मंधाना गार्डनरच्या गोलंदाजीवर 2 धावांवर पायचित झाली. त्यानंतर आलेली याशिका भाटिया 4 धावांवर रनआऊट झाली. त्यानंतर आलेल्या जेमिमार रोड्रीग्सने धुवांधार खेळी करीत 24 धावांत 43 धावांची दमदार खेळी केली. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमीमाह रोड्रीग्स या जोडीनेच भारतीय संघाच्या धावफलकाला आकार दिला. हरमनप्रीतने कर्णधारपदाला साजेशी खेळी करीत दमदार 52 धावा ठोकल्या. त्यामुळे तिने सामना रोमांचक मोडमध्ये आणून ठेवला. ती दुर्दैवी धाव घेताना खूप बॅडलकने रनआऊट झाली. तिच्याअगोदर दीप्ती शर्मा ब्राऊनच्या गोलंदाजीवर ताहिलाद्वारे झेलबाद झाली. त्यानंतर आलेली स्नेह राणा जोनसेनद्वारे क्लिन बोल्ड झाली.

हेही वाचा : Ind Vs Aus Semi Final : रोमांचक सामन्यात भारताचा 5 धावांनी पराभव; हरमनप्रीत-जेमीमाह जोडीची झुंजार खेळी निष्फळ

ABOUT THE AUTHOR

...view details