बर्मिंगहॅम: भारतीय वेटलिफ्टर संकेत महादेव सरगरने ( Indian weightlifter Sanket Mahadev Sargar ) शनिवारी बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पहिले पदक मिळवून दिले. त्याने पुरुषांच्या 55 किलो गटात रौप्यपदक पटकावले ( Weightlifter Sanket Sargar won silver medal ). महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील 22 वर्षीय संकेत सरगरने एकूण 248 किलो वजन उचलले, परंतु मलेशियाच्या मोहम्मद अनिक बिन कासदानने त्याला मागे टाकले. त्याने तिसऱ्या आणि अंतिम प्रयत्नात क्लीन अँड जर्कमध्ये आपले एकूण 249 किलो वजन उचलले. त्याचवेळी श्रीलंकेच्या केडी योदागेने 225 किलो वजन उचलून कांस्यपदक पटकावले.
हे भारतासाठी सहज सुवर्णपदक ठरू शकले असते, कारण शेतकरी कुटुंबातील सरगरने चांगली सुरुवात करून आघाडी घेतली होती. क्लीन अँड जर्कमध्ये पहिल्या प्रयत्नात 135 किलो वजन उचलल्यानंतर, दोन प्रयत्नात 139 किलो वजन उचलण्यात तो अयशस्वी ठरला. कारण त्याच्या उजव्या हाताला दुखापत ( Sanket Sargar's right hand injured ) झाली.
सुवर्ण जिंकल्यानंतर संकेत सरगर ( weightlifter Sanket Sargar Reaction ) म्हणाला, क्लीन अँड जर्कमधील दुसऱ्या प्रयत्नात मला आवाज आला आणि वजन कमी झाले. यानंतर माझ्या प्रशिक्षकाने माझ्या हाताकडे पाहिले. मला खूप वेदना होत होत्या, पण तरीही मी तिसरी पायरी पूर्ण केली. सुवर्णपदक जिंकण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न केला, पण मला अपयश आले. तो पुढे म्हणाला, मला सुवर्णपदक मिळाले नाही, त्यामुळे मी निराश झालो. मी खूप प्रयत्न केले, पण दुखापतीमुळे अपयशी ठरलो. देशात सुरू असलेल्या 'आझादी का अमृत महोत्सव' या सोहळ्यासाठी मी आपले रौप्य पदक समर्पित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.