महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करते; रौप्यपदक जिंकल्यानंतर मीराबाईची मन जिंकणारी प्रतिक्रिया - रौप्यपदक

टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पहिले पदक जिंकून दिल्याचा मला आनंद आहे. मी फक्त मणीपूरची नाही तर संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करते, असे मीराबाई चानूने सांगितलं.

weightlifter mirabai chanu reaction after the win silver medal
संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करते; रौप्यपदक जिंकल्यानंतर मीराबाईची मन जिंकणारी प्रतिक्रिया

By

Published : Jul 24, 2021, 3:07 PM IST

टोकियो - भारतीय महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने रौप्यपदक जिंकले. भारताचे टोकियो ऑलिम्पिकमधील हे पहिलं पदक आहे. मीराबाई चानूने 49 किलो वजनी गटात ही ऐतिहासिक कामगिरी केली. तिने वेटलिफ्टिंग प्रकारात 21 वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आणला. चानूने स्नॅचमध्ये 87 तर क्लिन अॅण्ड जर्कमध्ये 115 असे एकूण 202 किलो वजन उचलत पदक जिंकले. या चंदेरी कामगिरीनंतर चानूने मन जिंकणारी प्रतिक्रिया दिली आहे.

पदक जिंकल्यानंतर बोलताना मीराबाई चानू म्हणाली की, 'मी खूप आनंदी आहे. पदकासाठी मी गेली पाच वर्ष स्वप्न पाहत होते. मला स्वत:चा अभिमान वाटत आहे. मी सुवर्ण पदकासाठी सर्वोत्तम प्रयत्न केला होता. पण रौप्यपदक ही देखील मोठे यश आहे.'

टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पहिले पदक जिंकून दिल्याचा मला आनंद आहे. मी फक्त मणीपूरची नाही तर संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करते, असे देखील मीराबाई चानूने सांगितलं.

दरम्यान, मीराबाई चानूवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी मीराबाईचे अभिनंदन केलं आहे.

मल्लेश्र्वरीनंतर वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकणारी मीराबाई दुसरी -

कर्णम मल्लेश्र्वरीने सिडनी ऑलिम्पिक 2000 मध्ये वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकले होते. तिने त्यावेळी एकूण 240 किलोग्राम वजन उचलले होते. स्नॅचमध्ये 110 तर क्लीन अॅन्ड जर्कमध्ये 130 किलोग्राम वजन उचलत मल्लेश्र्वरीने कांस्य पदक जिंकले होते. ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकणारी मल्लेश्र्वरी पहिली आहे. तर आज मीराबाईने रौप्यपदक जिंकले आहे. वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकणारी मीराबाई भारताची पहिली खेळाडू आहे.

हेही वाचा -Tokyo Olympics : मीराबाई चानूला रौप्यपदक; भारताचा टोकियोमध्ये पदकाचा श्रीगणेशा

हेही वाचा -मीराबाई चानू: लाकडाचा भारा उचलण्यापासून ते ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकण्यापर्यंतचा प्रवास

ABOUT THE AUTHOR

...view details