नवी दिल्ली : भारत आणि वेल्स यांच्या आजच्या सामन्यातील ही लढत अतिशय रोमांचक झाली आहे. मात्र, अखेरच्या क्वार्टरमध्ये टीम इंडियाने बाजी मारली. उपांत्य पूर्व फेरीत पोहोचण्यासाठी आता भारतापुढे आता न्यूजीलंडच्या संघासमोर आव्हान आहे. न्यूझीलंड आणि टीम इंडियामध्ये क्रॉस ओवर सामना होणार आहे. हा सामना 22 जानेवारी रोजी होणार आहे.
जबरदस्त पुनरागमन : कलिंगा स्टेडिअममध्ये झालेल्या सामन्यात भारतासाठी शमशेर सिंह आणि आकाशदीप सिंह यांनी गोल केले. शमशेर सिंह याने भारतासाठी पहिला गोल केला. पहिल्या हाफमध्ये दोन गोलने आघाडी घेतली होती. पण तिसऱ्या क्वार्टरच्या अखेरीस वेल्सने जबरदस्त पुनरागमन केले आहे. ग्रुप डी मध्ये भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे.
भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर : पेनल्टी कार्नरवर गोल करत वेल्सने 2-2 ने बरोबरी केली. चौथ्या क्वार्टरमध्ये दोन गोल करत भारतीय संघानं हा सामना जिंकला. ग्रुप डी मध्ये भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. तीन सामन्यात दोन विजयासह टीम इंडियाने सात गुणांची कमाई केली आहे. इंग्लंडचा संघ डी ग्रुपमध्ये आघाडीवर आहे. इंग्लंडकडे सात गुण आहेत.
आपला दुसरा सामना जिंकला : चौथ्या क्वार्टरच्या सुरुवातीलाच मैदानी गोल करत आकाशदीप सिंगने भारताला आघाडी मिळवून दिली. या सामन्यातील आकाशदीपचा हा दुसरा गोल आहे. यापूर्वी त्याने तिसऱ्या क्वार्टरमध्ये गोल केला होता. चौथ्या क्वार्टरच्या 9व्या मिनिटाला अभिषेकने जवळपास गोल केला. मात्र, चेंडू विरोधी संघाच्या शरीरावर आदळला आणि गोलपोस्टमध्ये गेला. चौथ्या क्वार्टरच्या शेवटी भारताला सातवा पेनल्टी कॉर्नर मिळाला. हरमनप्रीतने त्याचे गोलमध्ये रूपांतर केले. या क्वार्टरच्या शेवटी भारताने वर्ल्ड कपमधील आपला दुसरा सामना जिंकला आहे.
प्लेअर ऑफ दी मॅच : रंगतदार सामन्यात शमशेर सिंह याने टीम इंडियासाठी 21 व्या मिनिटाला पेनाल्टी कॉर्नरवर जबरदस्त गोल केला. शमशेर सिंह याच्यानंतर आकाशदीप याने लागोपाठ दोन गोल केले. आकाशदीप याने 32 व्या आणि 45 व्या मिनिटाला फील्ड गोल केले. चौथ्या क्वार्टरमध्ये टीम इंडियाच्या कर्णधाराने पेनाल्टी कॉर्नरवर गोल करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आकाशदीप सिंहला प्लेअर ऑफ दी मॅचचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
भारताची टीम : पीआर श्रीजेश (गोलकीपर), सुरेंदर कुमार, मनप्रीत सिंग, मनदीप सिंग, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), शमशेर सिंग, वरुण कुमार, आकाशदीप सिंग, अमित रोहिदास, विवेक सागर प्रसाद, सुखजित सिंग
हेही वाचा :भारत जोडो यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये दाखल; पाहा खास व्हिडिओ