नवी दिल्ली - टोकियो येथे पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेला कमी वेळ उरला असताना भारताला धक्का बसला आहे. जागतिक उत्तेजक विरोधी संस्थाने (वाडा) देशातील राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेला (एनडीटीएल) सहा महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे.
या बंदीमुळे देशातील उत्तेजक विरोधी कार्यक्रमाला धक्का बसला आहे. वाडाने एका प्रेस नोटमध्ये म्हटले, 'वाडाच्या चौकशीदरम्यान एनडीटीएलने प्रयोगशाळांसाठी तयार केलेले आंतरराष्ट्रीय मानके (आयएसएल) पूर्ण केल्याचे आढळले नाही, त्यामुळे त्यांच्यावर उत्तेजक चाचणीसाठी बंदी घालण्यात आली आहे.'