नवी दिल्ली -यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) मुख्य प्रायोजकत्वापासून माघार घेतल्यानंतर विवोने अजून एका स्पर्धेतून आपले नाव काढून घेतले आहे. अल्पावधीत प्रसिद्धी मिळालेल्या प्रो-कबड्डी लीगच्या मुख्य प्रायोजकत्वामधूनही विवोने एक्झिट घेतली. जूनमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर देशात चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याविषयी मत झाले होते.
२०१७ मध्ये विवोने प्रो कबड्डीसह प्रसारणकर्ता स्टार इंडियासोबत ३०० कोटींचा करार केला होता. दरवर्षी प्रायोजक म्हणून विवो आणि प्रो कबड्डी यांच्यात ६० कोटींचा व्यवहार होता. एका वृत्तानुसार, नकारात्मक प्रचारामुळे विवोने फारकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.