मुंबई - पाच वेळा विश्वविजेता ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदने बुद्धिबळ खेळातील बदलाविषयी प्रतिक्रिया दिली आहे. ''संगणकाच्या आगमनाने खेळाडूंची बुद्धिबळ खेळण्याची पद्धत बदलली, यामुळे दोन्ही प्रतिस्पर्ध्यांची बसण्याची जागा बदलत नाही'', असे आनंदने म्हटले.
संगणकामुळे बुद्धिबळ बदलले - आनंद - changes in chess anand news
संगणकाच्या आगमनाने खेळाडूंची बुद्धिबळ खेळण्याची पद्धत बदलली, असे आनंद म्हणाला. यावेळी त्याने आपल्या कारकिर्दीमध्ये घेतलेल्या कठोर परिश्रमाविषयीही भाष्य केले.
आनंदने आपल्या कारकिर्दीमध्ये घेतलेल्या कठोर परिश्रमाविषयी भाष्य केले. एका कार्यक्रमात आनंद म्हणाला, "जेव्हा मी सहा वर्षांचा होतो तेव्हा माझा मोठा भाऊ आणि बहीण बुद्धिबळ खेळत होते. मग मी माझ्या आईकडे गेलो आणि तिला मला हा खेळ शिकवायला सांगितले. बुद्धिबळपटू म्हणून माझी प्रगती अचानक झाली नव्हती, बर्याच वर्षांच्या मेहनतीचे फळ होते.''
जागतिक बुद्धीबळ चॅम्पियन विश्वनाथन आनंदला डब्ल्यूडब्ल्यूएफ (वर्ल्ड वाइड फंड) इंडियाच्या पर्यावरण शिक्षण कार्यक्रमाचा ब्रँड अम्बेसिडर बनवण्यात आले आहे. आनंदसह भारतातील सहा अव्वल बुद्धिबळपटूंनी पंतप्रधान निधीसाठी साडेचार लाखांचा निधी जमा केला आहे. कोरोनाविरूद्धच्या लढाईसाठी आनंदसह सहा भारतीय खेळाडूंनी हा निधी जमावला आहे.