नवी दिल्ली - भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदला लेजेंड स्पर्धेत तिसरा पराभव पत्करावा लागला. रशियाच्या व्लादिमीर क्रॅमनिकने आनंदचा 2.5-0.5 असा पराभव केला.
या पराभवामुळे आनंदला गुणतालिकेत खाली जावे लागत आहेत. यापूर्वी, त्याला सुरुवातीच्या दोन फेऱ्यांमध्ये पीटर स्वीडलर आणि मॅग्नस कार्लसन यांच्याकडून पराभव स्विकारावा लागला होता.
अन्य सामन्यांमध्ये कार्लसनने हंगेरीच्या पीटर लेकोचा 2.5-0.5 असा पराभव केला. तीन स्पर्धांमध्ये हा त्याचा तिसरा विजय आहे. तो रशियाच्या स्वीडलरशी संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे. स्वीडलरने इस्राईलच्या बोरिस गेलफँडला 2.5-0.1 अशा फरकाने पराभूत करून तिसरा विजय नोंदवला.
आनंदचा सामना आता नेदरलँडच्या अनिश गिरीशी होणार आहे. दहा खेळाडूंच्या रॉबिन राऊंड लीगनंतर अव्वल चार खेळाडू उपांत्य फेरीत खेळतील. 31 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान उपांत्य फेरीचे सामने खेळले जातील. अंतिम सामना 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान खेळला जाईल.