नवी दिल्ली - भारताचा महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदची लेजेंड स्पर्धेत पराभवाची मालिका सुरूच आहे. आनंदला या स्पर्धेत सलग सहावा पराभव पत्करावा लागला. रशियाच्या इयान नेपोमानियाचीने आनंदला 3-2 असे हरवले.
विश्वनाथन आनंदचा पराभवाचा 'षटकार' - viswanathan anand latest news
सहाव्या फेरीत आनंदने 53 चालींसह पहिला सामना अनिर्णित राखला. मात्र, दुसर्या सामन्यात इयानने आनंदला 34 चालींनी पराभूत केले. तिसरा सामना 48 चालीनंतर अनिर्णित होता. त्यानंतर चौथ्या सामन्यात आनंदने विजय मिळवला. पण टाय ब्रेकरमध्ये रंगलेल्या अंतिम सामन्यात इयानने 48 चालींसह विजय मिळवला. आनंद या स्पर्धेत गुणतालिकेत सर्वात खाली आहे.

मॅग्नस कार्लसन टूरमध्ये पहिल्यांदा खेळत असलेल्या आनंदला यापूर्वी पीटर स्वीडलर, मॅग्नस कार्लसन, व्लादिमीर क्रॅमिक, अनिश गिरी आणि पीटर लेको यांच्याविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. दहा खेळाडूंच्या रॉबिन राऊंड लीगनंतर अव्वल चार खेळाडू उपांत्य फेरीत खेळतील. 31 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान उपांत्य फेरीचे सामने खेळले जातील. अंतिम सामना 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान खेळला जाईल.