नवी दिल्ली - भारताचा ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदला लेजेंड बुद्धिबळ स्पर्धेत सातवा पराभव पत्करावा लागला. जगातील तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू डिंग लीरनने आनंदचा 2.5-0.5 असा पराभव केला. पहिल्या सामन्यात आनंदला 22 चालींसह पराभव पत्करावा लागला तर, दुसरा सामना 47 चालींसह अनिर्णित राहिला. लिरेनने तिसरा सामना 41 चालींसह जिंकत आनंदवर विजय मिळवला.
विश्वनाथन आनंदच्या पराभवाची मालिका सुरूच - anand in legends tournament
विश्वनाथन आनंद या स्पर्धेत गुणतालिकेत सर्वात खाली आहे. मॅग्नस कार्लसन टूरमध्ये पहिल्यांदा खेळत असलेल्या आनंदला यापूर्वी पीटर स्वीडलर, मॅग्नस कार्लसन, व्लादिमीर क्रॅमिक, अनिश गिरी आणि पीटर लेको यांच्याविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे.
विश्वनाथन आनंदच्या पराभवाची मालिका सुरूच
विश्वनाथन आनंद या स्पर्धेत गुणतालिकेत सर्वात खाली आहे. मॅग्नस कार्लसन टूरमध्ये पहिल्यांदा खेळत असलेल्या आनंदला यापूर्वी पीटर स्वीडलर, मॅग्नस कार्लसन, व्लादिमीर क्रॅमिक, अनिश गिरी आणि पीटर लेको यांच्याविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे.
दहा खेळाडूंच्या रॉबिन राऊंड लीगनंतर अव्वल चार खेळाडू उपांत्य फेरीत खेळतील. 31 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान उपांत्य फेरीचे सामने खेळले जातील. अंतिम सामना 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान खेळला जाईल.