महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद आता डब्ल्यूडब्ल्यूएफचा ब्रँड अम्बेसिडर - विश्वनाथन आनंद आता डब्ल्यूडब्ल्यूएफचा ब्रँड अम्बेसिडर न्यूज

आनंद म्हणाला, “आपली मुले एक चांगल्या आणि हरित जगासाठी हक्कदार आहेत आणि पालक म्हणून त्यांची मार्ग दर्शवणे ही आपली जबाबदारी आहे. डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडियामध्ये सामील झाल्याने मी आनंदी आणि उत्साहित आहे.” कोरोनाच्या संकटामुळे आनंद सध्या जर्मनीत अडकला आहे.

Vishwanathan Anand becomes WWF's brand ambassador, message to save nature
ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद आता डब्ल्यूडब्ल्यूएफचा ब्रँड अम्बेसिडर

By

Published : Apr 17, 2020, 7:47 PM IST

नवी दिल्ली - पाच वेळा जागतिक बुद्धीबळ चॅम्पियन विश्वनाथन आनंदला डब्ल्यूडब्ल्यूएफ (वर्ल्ड वाइड फंड) इंडियाच्या पर्यावरण शिक्षण कार्यक्रमाचा ब्रँड अम्बेसिडर बनवण्यात आले आहे. डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडियाने भारतातील पर्यावरण संरक्षणाची ५० वर्षे पूर्ण केली आहेत. हा सन्मान मिळाल्यामुळे आनंदने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आनंद म्हणाला, “आपली मुले एक चांगल्या आणि हरित जगासाठी हक्कदार आहेत आणि पालक म्हणून त्यांची मार्ग दर्शवणे ही आपली जबाबदारी आहे. डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडियामध्ये सामील झाल्याने मी आनंदी आणि उत्साहित आहे.” कोरोनाच्या संकटामुळे आनंद सध्या जर्मनीत अडकला आहे.

माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंद यांच्यासह भारतातील सहा अव्वल बुद्धिबळपटूंनी पंतप्रधान निधीसाठी साडेचार लाखांचा निधी जमा केला आहे. कोरोनाविरूद्धच्या लढाईसाठी आनंदसह सहा भारतीय खेळाडूंनी हा निधी जमावला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details