महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2023 : विराट कोहलीने मुलाखतीत शेअर केली महत्त्वाची गुपिते; पाहुया माजी कर्णधाराची व्हिडिओ मुलाखत

रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा सर्वात वरिष्ठ खेळाडू आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने आयपीएलपूर्वी त्याचा खेळ, जीवनशैली आणि भविष्यातील योजनांबद्दल काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत. जाणून घेऊया विराटने सांगितलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी.

Virat Kohli video interview before IPL 2023
विराट कोहलीने मुलाखतीत शेअर केली महत्त्वाची गुपिते

By

Published : Mar 29, 2023, 3:11 PM IST

नवी दिल्ली : आयपीएल २०२३ सुरू होण्यास अवघे काही तास उरले आहेत. प्रत्येक संघ आपल्या खेळाडूंसोबत फोटोशूट आणि सराव सत्र करीत आहे. त्याचबरोबर संघातील खेळाडू आपल्या संघाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करीत आहेत. यासोबतच तो त्याचे काही रहस्यही उघड करीत आहे. असाच एक व्हिडिओ रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा सर्वात वरिष्ठ खेळाडू आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने शेअर केला आहे. ज्यामध्ये कोहली त्याच्याशी संबंधित अनेक मुद्द्यांवर बोलत आहे. आरसीबी बोल्ड डायरी मालिकेतील कोहलीची ही व्हिडीओ मुलाखत ऐकण्यासारखी आहे.

स्वतःला फ्रेश ठेवण्यासाठी या गायकाची गाणी ऐकतो :विराट कोहलीने त्याच्या हातावर बनवलेल्या एका खास टॅटूबद्दलही चर्चा केली आहे आणि ते कोणत्या प्रकारे खास आहे ते सांगितले आहे. यासोबतच स्वतःला फ्रेश ठेवण्यासाठी विराट कोहली खासकरून अरिजित सिंगच्या गाण्यांची प्लेलिस्ट आजकाल ऐकतो. विराट कोहलीने असेही सांगितले आहे की, त्याला उत्तराखंडमधील एक खास जागा खूप आवडते, जिथे त्याला अनेकदा जावेसे वाटते.

विराट कोहली या दोन महान खेळाडूंचा चाहता :विराट कोहलीने आपल्या मुलाखतीत सचिन तेंडुलकर आणि व्हिव्हियन रिचर्ड्स यांना महान खेळाडू म्हणून वर्णन केले आणि सांगितले की, तो या दोघांना फॉलो करतो. या दोन्ही खेळाडूंनी आपापल्या काळात खेळाचा दर्जा बदलला होता. त्यामुळे तो या दोन्ही खेळाडूंना फॉलो करतो.

विराटने आपल्या मुलीबद्दलच्या गोष्टी केल्या शेअर :विराट कोहलीनेदेखील आपल्या मुलीबद्दल काही गोष्टी शेअर केल्या आहेत आणि सांगितले आहे की, तो आपल्या मुलीचे बरेच फोटो क्लिक करतो आणि ते आपल्याजवळ ठेवतो. कारण वेगाने वाढणारी मुले कधी मोठी होतील, हे माहिती होणार नाही. म्हणूनच जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी अनेक फोटो काढता येतात. यासोबतच कोहलीने आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंना टिप्सही दिल्या आहेत.

हेही वाचा : Girish Bapat Passed Away : खासदार गिरीश बापट यांचे निधन; वैकुंठ स्मशनभूमीत होणार अंत्यसंस्कार

ABOUT THE AUTHOR

...view details