महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Virat Kohli Bought Luxurious Villa : विराट कोहलीने खरेदी केला मुंबईमध्ये आलिशान व्हिला; किंमत जाणून बसेल तुम्हाला धक्का... - विराट कोहलीने खरेदी केला मुंबईमध्ये आलिशान व्हिला

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने मुंबईतील अलिबाग परिसरात एक आलिशान बंगला खरेदी केला आहे. याआधीही विराट कोहलीचे अलिबागमध्ये स्वतःचे आलिशान फार्महाऊस खरेदी केले होते. ज्याचा व्यवहार त्याने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पूर्ण केला होता. आता त्याने दुसरी प्राॅपर्टी अलिबागमध्ये घेतली आहे, तब्बल 2000 चौरस फुटांचा हा बंगला असल्याचे बोलले जाते.

Virat Kohli Bought Luxurious Villa
विराट कोहलीने खरेदी केला मुंबईमध्ये आलिशान व्हिला

By

Published : Feb 24, 2023, 5:51 PM IST

नवी दिल्ली : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने नुकताच मुंबईतील अलिबाग परिसरात एक आलिशान व्हिला विकत घेतला आहे. विराट कोहलीने आवास व्हिलेजमधील हा आलिशान 2,000 चौरस फुटांचा व्हिला 6 कोटी रुपयांना खरेदी केला. ही मालमत्ता खरेदी करण्यासाठी विराटने 36 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे. अलिबाग परिसरातील विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची ही दुसरी मालमत्ता आहे. यापूर्वी, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दोघांनी अलिबागमध्ये 19.24 कोटी रुपये खर्चून, एक आलिशान फार्म हाऊस खरेदी केले होते. ज्यासाठी दोघांनी 1.15 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरल्याचे सांगितले जाते.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या कसोटी सामन्यात विराट व्यस्त :भारताचा अव्वल फलंदाज विराट कोहली बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी खेळल्या जात असलेल्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्यस्त आहे. कोहलीच्या व्यस्त वेळापत्रकामुळे, त्याचा भाऊ विकास कोहली हा अलिबागमध्ये कोहलीने विकत घेतलेल्या नवीन व्हिलाच्या नोंदणीची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी उपनिबंधक कार्यालयात पोहोचला. रिपोर्टनुसार, कोहलीने विकत घेतलेल्या या आलिशान व्हिलामध्ये 400 स्क्वेअर फुटांचा मोठा स्विमिंग पूलदेखील आहे. या प्रोजेक्टचे इंटीरिअर हृतिक रोशनची माजी पत्नी सुजैन खानने डिझाइन केले आहे.

भारताने पहिले दोन सामने सहज जिंकले :सध्याच्या कसोटी मालिकेतील कोहलीची कामगिरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने पहिले दोन सामने सहज जिंकले आहेत. मात्र, या मालिकेत कोहलीची कामगिरी काही विशेष झाली नाही. या मालिकेत खेळल्या गेलेल्या तीन डावांत विराटने केवळ 76 धावा केल्या आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना १ मार्चपासून इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकून मालिका जिंकण्याकडे टीम इंडियाचे लक्ष असणार आहे.

नुकताच विराटने आंतरराष्ट्रीय सामन्यात मोठा विक्रम केला :विराट कोहलीने दिल्ली कसोटीत मोठी कामगिरी नोंदवली आहे. कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25000 धावा पूर्ण केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने या विक्रमाची नोंद केली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25000 धावा करण्याचा टप्पा ओलांडला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याच्या घरच्या मैदानावर खेळल्या जात असलेल्या डावात त्याने ही कामगिरी केली. दिल्लीत खेळल्या जात असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात विराट कोहलीने ही कामगिरी केली.

हेही वाचा : Captain Harmanpreet Bad Luck : आम्ही सामन्यात विजयाच्या दिशेने असताना, मी ज्या प्रकारे रनआऊट झाले त्यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही : हरमनप्रीत कौर

ABOUT THE AUTHOR

...view details