नवी दिल्ली - भारताची आघाडीची महिला कुस्तीपटू विनेश फोगटने वॉरसॉ येथे झालेल्या पोलंड ओपन कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. तिने ५३ किलोग्रॅम वजनी गटात सुवर्णपदक जिंकले असून तिचे या गटातील हे सलग तिसरे सुवर्णपदक ठरले आहे.
भारताची कुस्तीपटू विनेश फोगटची कमाल, जिंकले तिसरे सुवर्ण
विनेश फोगटने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोलंडच्याच रुक्साना हिचा ३-२ ने पराभव केला. विजयानंतर विनेश ट्विट करत हि माहिती दिली. ती म्हणते, अंतिम सामन्यात बलाढ्य प्रतिस्पर्धीविरुध्द खेळताना उच्च दर्जाचा खेळ होते. ही बाब सकारात्मक असून यातून मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. पोलंडमधीर माझ्या कामगिरीवर मी आनंदी आहे.
विनेश फोगटने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोलंडच्याच रुक्साना हिचा ३-२ ने पराभव केला. विजयानंतर विनेश ट्विट करत हि माहिती दिली. ती म्हणते, अंतिम सामन्यात बलाढ्य प्रतिस्पर्धीविरुध्द खेळताना उच्च दर्जाचा खेळ होते. ही बाब सकारात्मक असून यातून मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. पोलंडमधील माझ्या कामगिरीवर मी आनंदी आहे.
विनेशने स्पर्धेत यापूर्वी उपांत्यपूर्व सामन्यात रिओ ऑलिंपिकमधील कांस्यपदक विजेत्या स्वीडनच्या सोफिया मॅटसनला हरवले होते. दरम्यान, विनेशने मागील महिन्यात स्पेनमध्ये पार पडलेल्या ग्रां प्री स्पर्धा आणि तुर्कीत झालेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदके पटकावली होती.