नवी दिल्ली - भारताचा संघ फिफा विश्वचषक 2022 (fifa world cup 2022) मध्ये खेळणार नसला तरी या विश्वचषकात एक भारतीय दिसणार आहे. तो फुटबॉल खेळाडू नसून वेलनेस कोच आहे. केरळचे रहिवासी असलेले विनय मेनन (Vinay Menon) यांची बेल्जियमने वेलनेस कोच म्हणून नियुक्ती केली आहे. (Belgium wellness coach in fifa world cup). ते फिफा विश्वचषकादरम्यान संघातील खेळाडूंच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर भर देणार आहे. बेल्जियम संघात सामील झाल्याबद्दल मेनन म्हणाले, 'विश्वचषक स्पर्धेत मी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.
चेल्सी फुटबॉल क्लबमध्ये देखील काम केले - 48 वर्षीय मेननने यापूर्वी चेल्सी फुटबॉल क्लबमध्ये देखील काम केले आहे. हा क्लब युरोपमधील शीर्ष क्लबपैकी एक आहे. 2011-12 आणि 2020-21 हंगामात UEFA चॅम्पियन्स लीग जिंकणाऱ्या चेल्सी संघातील खेळाडूंना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी पॉंडिचेरी विद्यापीठातून शारीरिक शिक्षणात एमफिल केली असून ते केरळमधील एर्नाकुलमजवळील चेराई गावचे रहिवासी आहेत.