महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Border Gavaskar trophy : भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका; विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने - विदर्भ क्रिकेट असोसिएशन

भारत आणि ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा कसोटी मालिकेत आमनेसामने येण्यासाठी उत्सुक आहेत. ऑस्ट्रेलियन संघ बंगळुरूमध्ये सराव करत असताना, भारतीय खेळाडूंचा व्हीसीएमध्ये जोरदार सराव सुरू आहे.

IND vs AUS
भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका

By

Published : Feb 5, 2023, 1:33 PM IST

नागपूर :भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना ९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. तो १३ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने असतील. या कसोटी मालिकेत भारताची कमान रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स यांच्याकडे असेल. कर्णधार रोहित शर्मा पहिल्या सामन्यात सूर्य कुमार यादवला संधी देऊ शकतो. सूर्याने आतापर्यंत वनडे आणि टी-२० मध्ये चमकदार कामगिरी केली आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ नागपुरात पोहोचला आहे. कशी आहे व्हीसीएची खेळपट्टी जाणून घ्या.

व्हीसीएचे आउटफिल्ड खूप वेगवान :लाल मातीपासून बनलेल्या गावस्कर करंडक स्पर्धेसाठी नागपूर सज्ज आहे. ही खेळपट्टी लाल मातीची बनलेला असल्यामुळे येथील खेळपट्टीवर चेंडूला भरपूर बाउंस मिळतो. त्यामुळे वेगवान गोलंदाजांसाठी ते फायदेशीर आहे. या खेळपट्टीवर विकेटच्या बाउंसमुळे फलंदाजी करणेही सोपे आहे. बाउंसमुळे चेंडू थेट बॅटवर येतो. व्हीसीएचे आउटफिल्ड खूप वेगवान आहे. याचा फायदा फलंदाजांना मिळू शकतो. जसजसा सामना पुढे सरकतो तसतशी खेळपट्टी संत होत जाते.

33 एकरात स्टेडियम :विदर्भ क्रिकेट स्टेडियम 2008 मध्ये पूर्ण झाले. यामध्ये सुमारे ४५ हजार प्रेक्षक सामना पाहू शकतील. हे स्टेडियम 33 एकरात पसरले आहे. त्याच्या सरळ सीमा 80 यार्ड आहेत आणि चौरस सीमा 85 यार्ड आहेत. या मैदानावर आतापर्यंत सहा कसोटी सामने, नऊ एकदिवसीय सामने आणि 12 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. व्हीसीए येथे पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 6-10 नोव्हेंबर 2008 रोजी खेळला गेला. पहिली कसोटी - 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी, विदर्भ क्रिकेट असोसिएशन, नागपूर. दुसरी कसोटी - १७ ते २१ फेब्रुवारी, अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली. तिसरी कसोटी - 1 ते 5 मार्च, हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन, धर्मशाला. चौथी कसोटी - 9 ते 13 मार्च, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद.

बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेटमधील महान खेळाडू : ऑस्ट्रेलियाचे अ‍ॅलन बॉर्डर आणि भारताचे सुनील गावस्कर यांच्या नावाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू झाली. बॉर्डर आणि गावस्कर हे कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिले दोन क्रिकेटपटू आहेत. ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 10,000 पेक्षा जास्त कसोटी धावा केल्या. सचिन तेंडुलकर (३२६२), रिकी पाँटिंग (२५५५) आणि व्हीव्हीएस लक्ष्मण (२४३४) या ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारे तीन खेळाडू आहेत.

हेही वाचा :Border Gavaskar Trophy History : बाॅर्डर-गावस्कर ट्राॅफीमध्ये खेळतात फक्त भारत आणि ऑस्ट्रेलिया; जाणून घेऊया दोन्ही संघांची या चषकातील कामगिरी

ABOUT THE AUTHOR

...view details