महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

हॅमिल्टनला मागे टाकत व्हर्स्टापेनने जिंकली अबुधाबी ग्रँड प्रिक्स

शनिवारी पोल पोजिशन मिळविणाऱ्या २३ वर्षीय व्हर्स्टापेनने बोटासपेक्षा १६ तर हॅमिल्टनपेक्षा १८.४ सेंकद कमी वेळ नोंदवला. बहरीन ग्रँड प्रिक्स जिंकल्यानंतर दुसर्‍या दिवशी २९ नोव्हेंबरला हॅमिल्टन कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळला होता.

By

Published : Dec 14, 2020, 9:57 AM IST

Verstappen wins season-ending Abu Dhabi GP in dominant style
हॅमिल्टनला मागे टाकत व्हर्स्टापेनने जिंकली अबुधाबी ग्रँड प्रिक्स

अबुधाबी - रेड बुल संघाच्या मॅक्स व्हर्स्टापेनने मर्सिडीजच्या वाल्टेरी बोटास आणि गतविजेत्या लुईस हॅमिल्टनला हरवत अबुधाबी ग्रँड प्रिक्सचे विजेतेपद पटकावले. व्हर्स्टापेनचा हा सध्याच्या मोसमातील दुसरा आणि कारकिर्दीतील दहावा विजय आहे. शनिवारी पोल पोजिशन मिळविणाऱ्या २३ वर्षीय व्हर्स्टापेनने बोटासपेक्षा १६ तर हॅमिल्टनपेक्षा १८.४ सेंकद कमी वेळ नोंदवला.

व्हर्स्टापेनने जिंकली अबुधाबी ग्रँड प्रिक्स

हेही वाचा -भारताच्या फलंदाजांची भंबेरी उडवण्यासाठी 'हा' गोलंदाज संघात होणार दाखल

व्हर्स्टापेनच्या संघातील अलेक्झांडर अल्बॉनने रेडबुलसाठी चौथे स्थान पटकावत ही शर्यत संस्मरणीय केली. मॅक्लारेनचा लांडो नॉरिस पाचव्या क्रमांकावर आहे. नुकताच कोरोनातून सावरलेला हॅमिल्टन मात्र ही शर्यत जिंकू शकला नाही. यंदाच्या हंगामात हॅंमिल्टनने १६ पैकी ११ विजय नोंदवले आहेत. एका हंगामात सर्वाधिक विजयाचा विक्रम सेबॅस्टियन व्हेटेलच्या नावावर आहे. त्याने २०१३च्या हंगामात १३ विजय नोंदवले आहेत.

व्हर्स्टापेनने जिंकली अबुधाबी ग्रँड प्रिक्स

बहरीन ग्रँड प्रिक्स जिंकल्यानंतर दुसर्‍या दिवशी २९ नोव्हेंबरला हॅमिल्टन कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे हॅमिल्टनला साखिर ग्रँड प्रिक्समध्ये भाग घेता आला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details