महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Usain Bolt missing USD12M : सुप्रसिद्ध खेळाडू उसेन बोल्ट झाला कंगाल, क्षणात अकाउंटमधून वळते झाले 12 मी डॉलर - latest Usain Bolt News

जमैकाचा सुप्रसिद्ध खेळाडू उसेन बोल्टच्या खात्यातून 12.7 मी डॉलरची रक्कम लंपास केल्यामुळे खळबळ उडाली. त्यामुळे उसेन बोल्ट क्षणांत कंगाल झाला आहे. उसेन बोल्टचे वकील लिंटन पी गॉर्डन यांनी बुधवारी याबाबतची तक्रार दाखल केली आहे.

Usain Bolt missing USD 12.7M
खेळाडू उसेन बोल्ट

By

Published : Jan 19, 2023, 6:37 PM IST

जमैका -सुप्रसिद्ध केळाडू उसेन बोल्ट क्षणात कंगाल झाला आहे. त्याच्या खात्यातून 12.7 मी डॉलर क्षणात गायब झाल्याने खळबळ उडाली. याबाबत उसेन बोल्टच्या वकिलाने माहिती दिली आहे. उसेन बोल्टची रक्कम एका खासगी गुंतवणूक करणाऱ्या कंपनीत वळती झाल्याची शंका उपस्थित करण्यात येत आहे. तपास यंत्रणा याबाबतचा तपास करत असल्याची माहितीही बोल्टच्या वकिलाने दिली आहे.

बोल्टच्या वकिलाने केली तक्रार :उसेन बोल्टचे वकील लिंटन पी गॉर्डन यांनी बुधवारी याबाबतची तक्रार दाखल केली आहे. त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत बोलताना स्टॉक आणि सेक्युरिटी लिमीटेडकडेला पत्र पाठवून आपली रक्कम परत मागितली आहे. गॉर्डन यावेळी बोलताना म्हणाले की बोल्टच्या बँक खात्यात 12.8 मी. डॉलर होते. मात्र आता त्याच्या खात्यात केवळ 12000 डॉलरच आहेत. त्यामुळे हा गंभीर फसवणुकीचा प्रकार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

तर करणार कारवाई :उसेन बोल्टच्या खात्यातून इतकी मोठी रक्कम क्षणात गायब झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. बोल्टच्या वकिलाने स्टॉक आणि सेक्युरिटी लिमीटेडकडे पत्र पाठवत रक्कर परत करण्याची मागणी केली आहे. मात्र 10 दिवसात रक्कम परत न केल्यास कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

कंपनीचे कारवाईचे आश्वासन :जमैकाच्या वित्तीय आयोगाकडे याबाबतची सगळी माहिती देण्याची सूचना कंपनी दिली आहे. त्यामुळे वित्तीय आयोग याप्रकरणी चौकशी करेल असेही कंपनीने आपल्या साईटवर नमूद केले आहे. आमच्या ग्राहकाचे नुकसान झालेले आहे. ही बाब आम्ही समजू शकतो. त्यामुळे आम्ही सगळे प्रकरण अत्यंत बारकाईने हाताळत असल्याचेही कंपनीने यावेळी नमूद केले.

वित्तमंत्र्यांचे चौकशीचे आदेश :उसेन बोल्टच्या खात्यातून इतकी मोठी रक्क क्षणात गायब झाल्याने जमैकातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. बोल्टच्या वकिलाने याबाबत वित्त आयोगाला पत्र लिहले आहे. त्यावर जमैकाचे वित्त मंत्री निगेल क्लार्क यांनी ही परिस्थिती चिंताजनक असली तरी विलक्षण आहे. वित्तीय संस्थावर संशय घेणे साहजिक आहे. मात्र आमच्या वित्तीय संस्था तसे करत नसल्याचेही त्यांनी नमूद केले. याप्रकरणात जमैका वित्तीय आयोगाने एका विशेष लेखापरिक्षकाची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या फसवणुकीच्या आरोपातील सत्य लवकरच समोर येईल, असेही सूत्रांनी यावेळी सांगितले.

रक्कमेसाठी सरकारची परवानगी :बोल्टच्या खात्यातून रक्कम काढल्यामुळे त्याच्यावर कंगाल होण्याची वेळ आली आहे. मात्र वित्त आयोगाने याबाबत चौकसी सुरू केली आहे. खासगी वित्तीय संस्था तात्पुरते व्यवहार करतात. मात्र मोठी गुंतवणूक किवा मोठी रक्कम वळती करण्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागते, अशी माहितीही वित्त विभागाच्या अधिकाऱ्याने मंगळवारी दिली. बोल्टने 100 मीटर, 200 मीटर 400 मीटर रनिंग स्पर्धेत विक्रम केला आहे.

हेही वाचा - Wrestlers Protest Against WFI : कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांविरोधात खेळाडूंचा संप सुरूच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण वाद

ABOUT THE AUTHOR

...view details