महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

US Open Prize Money यूएस ओपन चॅम्पियनला मिळणार 26 दशलक्ष डॉलर्स, एकूण बक्षिसांची रक्कम ऐकून व्हाल थक्क, घ्या जाणून - टेनिसच्या लेटेस्ट न्यूज

वर्षातील चौथे ग्रँडस्लॅम यूएस ओपन Grand Slam US Open 29 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान खेळवले जाईल. याबाबतची अमेरिकन टेनिस असोसिएशनने बक्षीसाची रक्कम जाहीर केली आहे. जी यावर्षीच्या इतर ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये सर्वाधिक आहे.

US Open
यूएस ओपन

By

Published : Aug 19, 2022, 6:51 PM IST

न्यूयॉर्क: यूएस ओपन ( US Open 2022 ) एकेरी चॅम्पियनला यावर्षी $ 26 लाख (सुमारे 20.73 कोटी) ची बक्षीस रक्कम मिळेल. 29 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या ग्रँडस्लॅम स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम प्रथमच $60 दशलक्ष इतकी आहे. अमेरिकन टेनिस असोसिएशनने ( American Tennis Association ) गुरुवारी सांगितले की, मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश करणाऱ्या खेळाडूला $80,000 तर दुसऱ्या फेरीत पोहोचणाऱ्याला $1,21,000 मिळतील. उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणाऱ्यांना $4,45,000 आणि उपांत्य फेरी खेळणाऱ्यांना $7,05,000 मिळतील. उपविजेत्याला $1.3 दशलक्ष दिले जातील.

कोरोना महामारीपूर्वी 2019 मध्ये चॅम्पियनला $39 दशलक्ष आणि पहिल्या फेरीत पराभूत झालेल्याला $58,000 दिले जात होते. गेल्या वेळी एकूण बक्षीस रक्कम $55 दशलक्ष होती. या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये बक्षीस ( Australian Open prize ) रक्कम $52 दशलक्ष होती, तर विम्बल्डन आणि फ्रेंच ओपनमधील बक्षीस ( Prizes at Wimbledon and the French Open ) रक्कम सुमारे $49 दशलक्ष होती.

हेही वाचा -Ftx Crypto Cup अरोनियनचा पराभव करत आर प्रज्ञानानंदने नोंदवला सलग चौथा विजय

ABOUT THE AUTHOR

...view details