न्यूयॉर्क: स्पेनच्या कार्लोस अल्काराझने ( Carlos Alcaraz ) यूएस ओपनच्या अंतिम फेरीत ( US Open Final ) धडक मारली आहे. त्याने उपांत्य फेरीत अमेरिकेच्या फ्रान्सिस टियाफोला ( Frances Tiafoe ) नॉकआउटमध्ये पराभूत केले. 19 वर्षीय अल्कारेझने उपांत्य फेरीचा सामना 6-7, 6-3, 6-1, 6-7, 6-3 अशा फरकाने जिंकला. तो पहिल्यांदाच यूएस ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. अंतिम फेरीत त्याचा सामना कॅस्पर रुडशी ( Casper Ruud ) होणार आहे. हा ग्रँडस्लॅम विजेता टेनिस क्रमवारीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा खेळाडूही बनेल. कॅस्पर रुडने उपांत्य फेरीत रशियाच्या कॅरेन काचानोव्हचा 7-6, 6-2, 5-7, 6-2 असा पराभव केला.
या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी चार तास 18 मिनिटे झुंज दिली, पण शेवटी अल्कारेझने बाजी मारली. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच त्याची जेतेपदाच्या दावेदारांमध्ये गणना केली जात होती. यूएस ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचणारा तो राफेल नदालनंतरचा दुसरा स्पॅनिश खेळाडू ( Second Spanish player to reach US Open final ) आहे. पराभवानंतर टियाफोने म्हटले आहे की, लवकरच तो जबरदस्त पुनरागमन करणार आहे.