हैदराबाद -प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामात यू मुंबाने तेलुगू टायटन्सविरुद्ध विजयी सुरुवात करत गुणतालिकेत खाते उघडले. आज त्यांचा सामना प्रो कबड्डीच्या पहिल्या पर्वाचे विजेते असलेल्या जयपूर पिंक पँथर्सशी होईल.
प्रो कबड्डी : जयपूरचे पँथर्स यू मुंबावर आक्रमणासाठी सज्ज - fazal atrachali
हैदराबादच्या प्रसिद्ध गच्चीबावली इंडोर स्टेडियममध्ये हा सामना होणार असून तो 7.30 वाजता सुरु होईल.
हैदराबादच्या प्रसिद्ध गच्चीबावली इंडोर स्टेडियममध्ये हा सामना होणार असून तो 7.30 वाजता सुरु होईल. तेलुगू टायटन्सविरुद्धच्या सामन्यात यू मुंबाने 25-31 असा विजय मिळवला होता. कर्णधार कर्णधार फझल अत्राचलीने चांगला बचाव केला होता. त्यामुळे आजच्या सामन्यातही नेतृत्वाबरोबरच बचावाची फळी अत्राचलीवर अवलंबून असणार आहे. यू मुंबाच्या अभिषेकने तेलुगू टायटन्सविरुद्धच्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्याचेही प्रदर्शन महत्वाचे ठरणार आहे.
दुसऱ्या बाजूला, यंदाच्या पर्वात जयपूरचा संघ दीपक हुडाच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा मैदानात उतरणार आहे. कर्णधार हुडा उत्तम चढाईपटू म्हणून ओळखला जातो. त्यामुळे यू मुंबावर आक्रमणाची जबाबदारी त्याच्यावर असेल. तर, संदीप कुमार धूल बचाव सांभाळेल.