बँकॉक/थायलंड: दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधूच्या ( Olympic medalist PV Sindhu ) नेतृत्वाखाली भारतीय महिला बॅडमिंटन संघाला, उबेर चषक स्पर्धेतील शेवटच्या गट डी सामन्यात दक्षिण कोरियाकडून 0-5 असा पराभव पत्करावा लागला. कॅनडा आणि अमेरिकेविरुद्ध सहज विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाला वास्तवाचा सामना करावा लागला आणि पाच सामन्यांत एकही सामना जिंकता आला नाही.
परंतु, या पराभवाचा भारतावर काहीही परिणाम होणार नाही. कारण त्याने गटात पहिल्या दोनमध्ये स्थान मिळवताना उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान पक्के केले होते. अनुभवी बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूसाठी ( Badminton player PV Sindhu ) हा सामना निराशाजनक होता. कारण तिला जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या आन सेओंगकडून सरळ गेममध्ये 15-21, 14-21 असा पराभव पत्करावा लागला. सिंधूचा सेओंगकडून हा सलग पाचवा पराभव असून कोरियाला 1-0 अशी आघाडी मिळाली आहे.